औरंगाबाद : अजिंठा लेणीला भेट देऊन बुधवारी उपराष्ट्रपतींचा ताफा औरंगाबादकडे परतत असताना, अचानक सिल्लोडमधील टिळकनगरात शिरला. पेशाने शिक्षक असलेल्या उज्ज्वला व माधव सोमवंशी यांच्या निवासस्थानी ते तासभर थांबले. मुलीच्या लग्नावर किती खर्च करणार, असा प्रश्न विचारून युआनचाओ यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. सोमवंशी यांनी हुंड्यामुळे किमान १५ लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यावर त्यांनी ‘हुंडा देऊ नका व तो खर्च मुलीच्या शिक्षणावर करा,’ असा सल्ला दिला. चीनच्या उपराष्ट्रपतींनी सोमवंशी कुटुंबाला एक भेटवस्तूही दिली. सोमवंशी यांनी शाल, श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
लग्नाऐवजी शिक्षणावर खर्च करा
By admin | Published: November 04, 2015 11:57 PM