मुंबई : जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्दी बेबी कॅम्पचे रविवारी दादर येथील सूर्यवंशी सभागृहात आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या वेळी बालरोग तज्ज्ञांकडून बालकांची मोफत तपासणी करण्यात आली.कॅम्पची सुरुवात दीप प्रज्ज्वलनाने झाली. या वेळी आयएपीच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष डॉ. समीर दलवाई, सचिव डॉ. सुशांत माने, आयएपीएचे माजी अध्यक्ष डॉ. उदय पै, खजिनदार डॉ. बेला वर्मा, जॉन्सन अॅण्ड जॉन्सनचे भूपेश मालाडकर, नरेश कापदुले, गिरीश परमार आणि मयूर दर्जी उपस्थित होते. बाळांच्या आरोग्याविषयी मार्गदर्शन करताना, डॉ. समीर दलवाई आणि डॉ. बेला वर्मा यांनी बाळांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? याविषयी पालकांना मार्गदर्शन केले, तर डॉ. सुशांत माने यांनी बालकांच्या आहाराविषयीची माहिती देत, पालकांच्या अनेक शंकांचे निरसन केले. कॅम्पमध्ये उपस्थित बालकांची या वेळी तपासणी करण्यात आली. विशेष म्हणजे, प्रत्येक सहभागी बालकास सहभाग प्रमाणपत्र, जॉन्सनतर्फे हेल्थ किट भेट देण्यात आली. (प्रतिनिधी)।एक वेगळी संकल्पना : जॉन्सन अॅण्ड जॉन्सन हा सर्वाधिक मातांचा लाडका ब्रॅण्ड आणि सामाजिक बांधिलकी जपत, क्रांती घडविणारे वृत्तपत्र म्हणजे ‘लोकमत’ यांनी हे पाऊल उचलून वेगळी संकल्पना मांडली आहे. या कार्यक्रमात सहभागी होऊन जागरूक पालकांची भूमिका निभावण्याची संधी यानिमित्ताने जॉन्सन अॅण्ड जॉन्सन व ‘लोकमत’ यांनी दिली आहे. आयएपी (इंडियन अॅकॅडमी आॅफ पेडियाट्रिक्स) ही भारतातील बालरोग चिकित्सकांची सर्वाधिक प्रतिनिधित्व करणारी संस्था आहे, जी आरोग्याच्या सुधारणेसाठी आणि बाळांच्या हितासाठी सतत झटत असते.
हेल्दी बेबी कॅम्पला उत्स्फूर्त प्रतिसाद
By admin | Published: August 02, 2016 2:21 AM