शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
2
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
3
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
4
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
5
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
6
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
7
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
8
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
10
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
11
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
12
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
13
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
14
द्रविडच्या RR नं दिला MS धोनीच्या CSK ला शह! कल्याणकर Tushar Deshpande चं 'कल्याण'
15
मल्लिका शेरावतचं फ्रेंच बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप! म्हणाली, "आजच्या काळात योग्य व्यक्ती शोधणं..."
16
IPL Auction 2025 : मुंबईकर अजिंक्य, पृथ्वी अन् शार्दुलसह या स्टार खेळाडूंना अनसोल्डचा टॅग
17
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता का? काय आहेत समज, गैरसमज; जाणून घेऊ सर्व प्रश्नांची उत्तरं
18
राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला; कारणही आलं समोर
19
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
20
देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार? मनोज जरांगे पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

राज्यात सर्वत्र उत्स्फूर्त मतदान

By admin | Published: February 22, 2017 4:44 AM

राज्यातील दहा महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसह ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी भर उन्हात

मुंबई : राज्यातील दहा महापालिका आणि ११ जिल्हा परिषदांसह ११८ पंचायत समित्यांसाठी मंगळवारी भर उन्हात मतदारांनी अत्यंत उत्स्फूर्तपणे मतदानाचा हक्क बजावल्याने यंदा मतदानाचा टक्का वाढला. काँग्रेस, राष्ट्रवादीसह भाजपा आणि शिवसेना, हे प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीत उतरल्याने यावेळी उमेदवारांची संख्याही वाढली. त्यामुळे सर्वच उमेदवारांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मेहनत घेतल्याचे दिसून आले. तसेच, निवडणूक आयोग आणि स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या जागृतीमुळे यावेळी मतदार घराबाहेर पडले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे आदी दिग्गज नेत्यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याने निवडणुकीचा पारा चढला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकूण ३,२१० जागांसाठी १७,३३१ उमेदवारांमध्ये लढत झाली. त्यासाठी ४३ हजार १६० मतदान केंद्रांची; तसेच ६८ हजार ९४३ कंट्रोल युनिट व १ लाख २२ हजार ४३१ बॅलेट युनिटसह यंत्रांची व्यवस्था करण्यात आली होती. मतदार याद्यांच्या घोळामुळे अनेकांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अनेकांची नावे गायब होती. शिवाय, मतदान केंद्र शोधण्यासाठीही बरीच धावपळ करावी लागली. यावेळी मुंबई वगळता अन्यत्र, महापालिका निवडणूक प्रभागानुसार असल्याने प्रारंभी मतदारांचा गोंधळ उडाला. (प्रतिनिधी)भाजपाचे उमेदवार पोलिसांच्या ताब्यातसोलापूर : सोलापूर महापालिका मतदानावेळी भाजपा उमेदवाराची पोलिसांशी झालेली बाचाबाची आणि ग्रामीण भागात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडे सापडलेली ६३ हजाराची रोकड वगळता शांततेत मतदान झाले.प्रभाग २५ मध्ये भाजपचे उमेदवार सुभाष शेजवाल यांची पोलिसांबरोबर बाचाबाची झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. तर एआयएमआयएमचे उमेदवार तौफिक शेख हे फरार असल्याने त्यांनी मतदान केले नाहे. माजी उपमहापौर हारुण सय्यद हे दोन दिवसापूर्वी झालेल्या मारामारी प्रकरणी पोलीस कोठडीत असले तरी न्यायालयाच्या परवानगीने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला.तिघांचा मृत्यूरत्नागिरी/सातारा : साताऱ्याजवळील नायगाव (ता.खंडाळा) येथील केंद्रावर मतदानासाठी आलेल्या ठकूबाई एकनाथ नेवसे (वय ८३) यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. रत्नागिरी जिल्ह्यात सुकिवली (ता.खेड) येथे महादेव शिवराम चाळके (वय ६४) यांचा मतदान केंद्रातच मृत्यू झाला. संतोष देवजी मोरे (४३) हे मतदानासाठी मुंबईहून खेडकडे येताना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला. हृदयविकाराने मृत्यूसोलापूरच्या सिध्देश्वर यात्रेतील मानकरी गंगाधर शटे (वय७५ ) हे मतदानासाठी आले असता मतदान केंद्राच्या आवारातच हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले.