शहरं
Join us  
Trending Stories
1
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
2
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
4
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
5
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
6
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
7
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
8
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
9
मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद
10
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
11
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
12
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
13
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
14
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
15
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
16
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
17
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
18
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
19
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
20
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'

अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

By admin | Published: May 18, 2016 1:18 AM

दुष्काळग्रस्त गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीत दुष्काळी आढावा बैठक झाली.

कुरकुंभ : दौंड तालुक्यातील दुष्काळग्रस्त गावातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कचेरीत दुष्काळी आढावा बैठक झाली. दौंड तालुक्यातील सामान्य जनता दुष्काळाच्या भीषण परिस्थितीतीशी दोन हात करत असताना याबाबत शासनदरबारी सकारात्मक विचारांचा अभाव दिसून येतो. दौंड तालुक्यातील जलयुक्त शिवाराच्या कामामध्ये होत असलेल्या दिरंगाईमुळे या कामांचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे खडकवासला कॅनॉलच्या लाभक्षेत्रात असणाऱ्या गावात पाणी येऊनदेखील न दिल्यामुळे अनेक गावांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असल्याची खंत या वेळी महेश भागवत यांनी व्यक्त केली. रावणगाव येथे जलयुक्त शिवारबाबत कृषी विभागाच्या कामातील दिरंगाईची व्यथा उत्तम आटोळे यांनी मांडली. दौंड शुगरचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनीदेखील पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाच्या कामाबाबत आक्षेप घेतला. या बैठकीतदेखील पाटबंधाऱ्याचे अधिकारी उपस्थित नव्हते.या वेळी रमेश थोरात, प्रदीप कंद, जालिंदर कामठे, आप्पासाहेब पवार, गुरमुख नारंग, सोहेल खान, बादशाह शेख, नितीन दोरगे, वैशाली नागवडे, रोहिणी पवार, आशा डेंबळकर, राजेश गायकवाड, प्रशांत धनवे, यांच्यासह दौंडचे विविध पदाधिकारी, तहसीलदार उत्तम दिघे, विविध खात्याचे अधिकारी उपस्थित होते. >सकारात्मक उत्तर मिळाले नाहीकृषी खात्यातील अधिकाऱ्यांना कामचुकारपणा चांगलाच भोवला. सुप्रिया सुळे यांनी जलयुक्त शिवारमधील कामाबाबत उपस्थित अधिकारी यांना जाब विचारला; मात्र यावर सकारात्मक उत्तर न आल्यामुळे बैठक सोडून जबाबदार अधिकाऱ्यांना बोलावण्यास सांगितले. त्यामुळे थोडा वेळपर्यंत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.>नक्की बैठकीत चाललंय काय?दौंड तालुक्यातील दुष्काळी दौऱ्यात विविध गावांचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे विविध अधिकारी सहभागी झाले होते. मात्र नवीन तहसीलदार कार्यालयाच्या बैठक सभागृहामध्ये माईकची व्यवस्था नसल्यामुळे या बैठकीदरम्यान विचारण्यात येणाऱ्या प्रश्नाची व त्यावर अधिकारी वर्गातून मिळणाऱ्या उत्तराचा मेळ कुणालाच घालता आला नाही.