पुणे : पाच लाखांत घर देण्याची फसवी जाहिरात करून लोकांची फसवणूक केल्याप्रकरणात गुन्हा दाखल झालेल्या मेपलच्या संचालकांचा शोध पोलिसांची तीन पथके घेत आहेत, अशी माहिती सायबर व गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली. मेपलच्या वतीने सोमवारपर्यंत सुमारे ११ हजार नागरिकांचे पैसे परत करण्यात आले आहेत. पाच लाखांत घर घेण्यासाठी मेपलकडे सुमारे ३२ हजार ५०० जणांनी नोंदणी केली होती. आॅनलाईन नोंदणी केलेल्या सुमारे १७ हजार ५०० जणांचे पैसे परत करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
अगरवाल बंधूंच्या शोधासाठी पथके
By admin | Published: April 26, 2016 5:56 AM