नवी मुंबई : आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांचे तीन दिवसांकरिता मुंबईत आगमन होत आहे. शुक्रवार २८ एप्रिल ते रविवार ३० एप्रिल दरम्यान मुंबई तसेच नवी मुंबई परिसरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘विज्ञान भैरव’ ग्रंथातील काही अद्भुत व गूढ माहिती दिली. हे अतिप्राचीन गूढ ज्ञान स्वयं श्री श्री रविशंकर सामान्य माणसांसाठी उपलब्ध करतील. हा कोर्स त्यांच्या भेटीचा मानबिंदू ठरणार आहे. या कोर्समध्ये ध्यान, प्रश्नोत्तरे व विशेष कार्यशाळेचा अंतर्भाव असेल. ३० एप्रिल रोजी दुपारी एनएससीआय डोम वरळी येथेच सक्षमीकरण (इम्पॉवर) या कार्यक्रमांतर्गत श्री श्री रविशंकर तरुणांसोबत शिक्षण क्षेत्रातील अनुभवी मान्यवरांची भेट घेतील. आर्ट आॅफ लिव्हिंग ही संस्था जगातील १५५हून अधिक देशांत कार्यरत आहे. युवा पिढीला, विद्यार्थ्यांना श्री श्री यांच्यासोबत यशाचे रहस्य प्रश्नोत्तरांद्वारे जाणून घेता येईल. रविवारी ३० एप्रिल रोजी संध्याकाळी ६ वाजता सीवूड्स, नवी मुंबई येथे महासत्संग होणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून विविध विभागांतून १ लाखाहून अधिक लोक या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.या सर्व कार्यक्रमातून जमा होणारा निधी संस्थेतर्फे महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या सामाजिक कामांसाठी वापरण्यात येईल. आर्ट आॅफ लिव्हिंगतर्फे संपूर्ण महाराष्ट्रातील २२ सदस्यांचे पुनर्जीवीकरण, ७०० हून अधिक सार्वजनिक शौचालयांची बांधणी, ३०,०००हून अधिक शेतकऱ्यांना सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण आणि ७ मोफत शाळांमधून १४१५ गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे. ‘इन्फिनिटी’ हा कार्यक्रमाचा मानबिंदू ठरणार असून हा कोर्स भारतात प्रथमच तेही मुंबईत श्री श्री रविशंकर यांच्या हस्ते होणार आहे. जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन आर्ट आॅफ लिव्हिंग संस्थेमार्फत करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
श्री श्री रविशंकर मुंबईत
By admin | Published: April 28, 2017 12:58 AM