शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
पालघरमध्ये ठाकरे गटाला धक्का, भारती कामडी यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश
3
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
4
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
5
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
6
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
7
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
8
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
9
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
10
पत्नी, वडिलांचा अपमान करणाऱ्याचा काढला काटा, पनवेलमधील घटना, उत्तर प्रदेशातून १ अटकेत
11
मार्गिकांसाठी आता वांद्रे-खार पादचारी पूल तोडणार, पश्चिम रेल्वेवरील हार्बरचे वेळापत्रक ६ महिने विस्कळीत राहणार
12
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
13
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
14
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
15
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
17
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
18
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
19
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
20
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा

कुणाच्या आदेशानुसार झाले श्रीदेवींवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार? माहितीच्या अधिकारातून झालं उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 6:25 PM

दुबईत अभिनेत्री अम्मा यंगर अय्यपन उर्फ श्रीदेवी हिचा मृत्यू झाल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीदेवी पद्मश्री असल्याकारणाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याची चर्चा होती पण प्रत्यक्षात शासकीय इतमामाने , कोण कोणत्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे याबाबतचे अधिकार मुख्यमंत्री महोदयाना असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली आहेत.

मुंबई -  दुबईत अभिनेत्री अम्मा यंगर अय्यपन उर्फ श्रीदेवी हिचा मृत्यू झाल्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. श्रीदेवी पद्मश्री असल्याकारणाने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाल्याची चर्चा होती पण प्रत्यक्षात शासकीय इतमामाने , कोण कोणत्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे याबाबतचे अधिकार मुख्यमंत्री महोदयाना असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस महाराष्ट्र शासनाने दिली आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार श्रीदेवीचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले गेल्याची बाब स्पष्ट झाली आहे. 22 जून 2012 ते 26 मार्च 2018 पर्यंत महाराष्ट्रात 40 व्यक्तीवर अश्याप्रकारे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले आहेत.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महाराष्ट्र शासनाच्या राजशिष्टाचार विभागाकडे शासकीय इतमामात श्रीदेवी यांचे झालेल्या अंत्यसंस्कार आणि याबाबत ज्यास अधिकार आहेत त्याची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री प्रमुख असलेल्या सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार खात्याने अनिल गलगली यांस कळविले की शासकीय इतमामाने , कोण कोणत्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करावयाचे याबाबतचे अधिकार मुख्यमंत्री महोदयाना आहेत. दिवंगत अभिनेत्री अम्मा यंगर अय्यपन उर्फ श्रीदेवी यांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याबाबत  दिनांक 25 फेब्रुवारी 2018 रोजी मुख्यमंत्री सचिवालयाकडून मौखिक निर्देश प्राप्त झाल्यानुसार दिनांक 26 फेब्रुवारी 2018 च्या शासन पत्रानुसार कार्यवाही करण्यासाठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी आणि मुंबई पोलीस आयुक्त यांस कळविण्यात आले. या माहितीची विचारणा करण्याच्या प्रयोजनाबाबत अनिल गलगली यांस विचारणा केली असता गलगली म्हणाले की ' श्रीदेवी हिच्या मृत्युनंतर जेव्हा शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले तेव्हा सांगितले जात होते की ज्यांस पद्मश्री दिली जाते त्या व्यक्तीचे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातात, याची पुष्टी करण्यासाठी माहिती विचारली होती पण यात पद्मश्री असल्याने शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतात याची पुष्टी झाली नाही उलट हे अधिकार मुख्यमंत्र्यांना असल्याची नवीन माहिती समोर आली आहे'.

 22 जून, 2012 ते 26 मार्च, 2018 पर्यंत शासकीत इतमामात अंत्यसंस्कार झालेल्या मान्यवरांची यादी 

दिनांक 22 जून, 2012 ते दिनांक 26 मार्च, 2018 पर्यंत श्रीदेवीं व्यतिरिक्त एकूण 40 मान्यवरांवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. - श्रीमती मृणाल गोरे, माजी खासदार ( 17/07/2012),- विलासराव देशमुख,  माजी केंद्रिय मंत्री व माजी मुख्यमंत्री ( 14/08/2012),- प्रभाकर कुंटे, माजी मंत्री (15/08/2012),- कृष्णराव देसाई ऊर्फ बाबासाहेब कुपेकर, माजी विधानसभा अध्यक्ष (26/09/2012),- शंकरराव देवराम काळे, माजी राज्यमंत्री (05/11/2012), - बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख (17/11/2012),- लक्ष्मण रंगनाथ हातणकर, माजी राज्यमंत्री (22/11/2012),- शंकरराव जगताप, माजी विधानसभा अध्यक्ष (10/12/2012 ),- दिनकर बाळू पाटील, माजी खासदार  ( 24/06/2013),- सहकार महर्षी छत्रपाल उर्फ बाबासाहेब आनंदराव केदार, माजी राज्यमंत्री (02/08/2013),- रजनी रॉय, माजी नायब राज्यपाल, पाँडेचरी (29/08/2013),- सत्यनारायण गोएंका, विपश्यना गुरुजी (29/09/2013),- मोहन धारिया, माजी केंद्रीय मंत्री (14/10/2013),- सुभाष झनक, माजी मंत्री (28/10/2013),- सय्यदना मोहम्मद बुऱ्हानुद्दीन, बोहरा धर्मगुरु ( 17/01/2014),- दत्तात्रय नारायण पाटील, माजी आमदार (28/02/2014) ,- अ.र.अंतुले, केंद्रिय मंत्री व माजी मुख्यमंत्री ( 02/12/2014),- आर.आर. पाटील, माजी उप मुख्यमंत्री ( 16/02/2015  ),- गोविंदराव वामनराव आदिक, माजी मंत्री, (07/06/2015 ),- डॉ. सय्यद अहमद, राज्यपाल, मणिपूर ( 27/09/2015) ,- रामभाऊ कापसे,अंदमान व निकोबारचे माजी नायब राज्यपाल ( 29/09/2015), - मदन विश्वनाथ पाटील, माजी कॅबिनेट मंत्री (16/10/2015),- प्रमोदबाबू भाऊरावजी शेंडे, माजी विधानसभा उपाध्यक्ष (14/11/2015 ),- शरद जोशी, माजी खासदार व शेतकरी संघटनेचे संस्थापक, अध्यक्ष  (12/12/2015),- मंगेश पाडगावकर, ज्येष्ठ कवीवर्य (30/12/2015),- डॉ.दौलतराव आहेर, माजी आरोग्यमंत्री (19/01/2016), - डॉ. भवरलाल जैन, जैन इरिगेशन समूहाचे संस्थापक (25/02/2016), - निहाल मौलवी मो. उस्मान अहमद  माजी मंत्री (29/02/2016),- निवृत्त नामदेव ऊर्फ बापूसाहेब थिटे,माजी खासदार व राज्याचे गृह राज्यमंत्री (19/03/2016), - बाबूराव महादेव भारस्कर, माजी समाजकल्याण मंत्री (01/05/2016),- मनोहर ऊर्फ बाबासाहेब गोपले, मातंग समाजाचे नेते (21/08/2016),-  श्रीमती जयवंतीबेन मेहता, माजी केंद्रीय राज्यमंत्री (07/11/2016 ),- मधुकरराव किंमतकर, माजी अर्थ राज्यमंत्री ( 03/01/2018 ),- वसंत डावखरे, विधानपरिषदेचे माजी सभापती (05/01/2018), - प्रा. नारायण सदाशिव फरांदे, विधानपरिषदेचे माजी सभापती(16/01/2018),- ॲड. चिंतामण वनगा, लोकसभा सदस्य (30/01/2018), - मुझफ्फर हुसेन, ज्येष्ठ पत्रकार (13/02/2018), - डॉ. बी. के. गोयल, पद्मविभूषण (20/02/2018)- डॉ. पतंगराव कदम, माजी मंत्री। (09/03/2018) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Srideviश्रीदेवीMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार