मुंबई- दहावी आणि बारावीच्या परीक्षेबद्दलचा संभ्रम दूर झाला असून त्या नियमित मूल्यमापन पद्धतीने ऑफलाईनच होणार असल्याचं शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी गेल्या आठवड्यात जाहीर केलं. यानंतर आता परीक्षेचं सविस्तर वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
दहावीची परीक्षा या १५ मार्च २०२२ ते ४ एप्रिल २०२२ दरम्यान पार पडणार आहे. याबद्दलची घोषणा गेल्या आठवड्यात करण्यात आली. आता सविस्तर वेळापत्रक जाहीर झालं आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे.
दहावीच्या परिक्षेचं वेळापत्रक-१५ मार्च- प्रथम भाषा१६ मार्च- द्वितीय वा तृतीय भाषा२१ मार्च- हिंदी२२ मार्च- संस्कृत, उर्दू, गुजराती आणि इतर द्वितीय आणि तृतीय भाषा२४ मार्च- गणित भाग-१२६ मार्च- गणित भाग-२२८ मार्च- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग १३० मार्च- विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग २१ एप्रिल- सामाजिक शास्त्र पेपर १४ एप्रिल- सामाजिक शास्त्र पेपर २निकाल कधी?इयत्ता १२ वीचा निकाल जून २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत आणि इ. १०वीचा निकाल जुलै २०२२ च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्याचा आमचा प्रयत्न राहील.कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे काटेकोर पालन करूनच सर्व परीक्षा पार पडतील. तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य,सुरक्षितता आमची प्राथमिकता आहे. सुरक्षित व पोषक वातावरण प्रदान करण्यासाठी याअगोदर परीक्षा वेळापत्रक,पद्धतीबद्दल राज्यभरातील शाळा, मुख्याध्यापक, शिक्षक व मूल्यांकनासंदर्भातील तज्ज्ञांसोबत विस्तृत चर्चा करून त्यांच्या मौल्यवान सूचनांचा समावेश करण्यात आला आहे, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.