मुंबई - राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी सकाळी ११ वाजता जाहीर करण्यात आला. त्यानंतर, विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने हा निकाल जाहीर झाला. राज्याचा एकूण निकाल ९९.९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग १०० टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. विशेष म्हणजे यंदा दहावीच्या परीक्षेत ९५७ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. Maharashtra SSC Result 2021: 100 percent marks for 957 students in X results; Results of 22,384 schools '100 per cent
कोरोनामुळे यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे निकाल जाहीर करण्यात आला. त्यानुसार, राज्याचा निकाल ९९.९५ टक्के एवढा लागला आहे. त्यामध्ये कोकणा विभागाचा निकाल १०० टक्के लागला असून पुणे विभागाचा सर्वात कमी म्हणजे ९९.६५ टक्के लागला आहे. विशेष म्हणजे या परीक्षेत तब्बल ९५७ विद्यार्थ्यांना १०० पैकी १०० टक्के गुण मिळाले आहेत. राज्यातील २२,७६७ शाळांपैकी २२,३८४ शाळांचा १०० टक्के निकाल लागला आहे.
असा बनविण्यात आला निकाल
राज्य शिक्षण मंडळामार्फत २९ एप्रिल ते २० मे दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येणार होती; परंतु कोरोनामुळे ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्याचे ठरले. त्यानुसार विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यमापन करण्यासाठी आणि ते संगणक प्रणालीत नोंदविण्यासाठी माध्यमिक शाळांना २३ जूनपासून ९ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली. शाळांकडून संगणक प्रणालीमार्फत विद्यार्थ्यांचे गुण विभागीय मंडळाकडे पाठविण्यात आले. त्यानंतर विभागीय मंडळाने शाळांकडून आलेले अंतर्गत गुण एकत्रित करून विद्यार्थ्यांचा अंतिम निकाल तयार करण्यासाठी प्रस्ताव राज्य मंडळाकडे पाठवले.
विभागिय मंडळ निहाय निकालपुणे : ९९.६५नागपूर :९९.८४औरंगाबाद :९९.९६मुंबई :९९.९६कोल्हापूर :९९.९२अमरावती :९९.९८नाशिक : ९९.९६ लातूर :९९.९६कोकण :१००
परीक्षेसाठी बसलेलेविद्यार्थी : ९,०९,९३१विद्यार्थिंनी : ७,४८,६९३एकूण : १६,५८,६२४
निकाल पाहण्यासाठी लिंक : www.result.mh-ssc.ac.inशाळांना एकत्रित निकाल पाहण्यासाठी : www.mahahsscboard.in