मुंबई - दहावीचा निकाल शनिवारी (8 जून) दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल उद्या ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळाने दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल. या संकेतस्थळावरून विषयनिहाय गुणांची प्रतही घेता येणार आहे. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेच्या निकालाबाबत सोशल मीडियावर अफवा पसरविल्या जात होत्या. मात्र मंडळाने आज निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे.
इयत्ता बारावीचा निकाल 28 मे रोजी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी व पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा होती. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावरून निकालाच्या तारखांचा संदेश व्हायरल होत होता. त्यामुळे संभ्रम निर्माण झाला होता. मंडळाकडूनही अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले होते. अखेर मंडळाने शुक्रवारी निकालाची तारीख जाहीर केली. त्यानुसार शनिवारी ऑनलाईन निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजल्यानंतर मंडळाने दिलेल्या तीन संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. ऑनलाईन निकालाबरोबरच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारेही निकाल समजू शकेल. राज्यभरातून 22 हजार 224 शाळांमधून 17 लाख 813 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
निकाल पाहण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा
www.mahresult.nic.inwww.sscresult.mkcl.orgwww.maharashtraeducation.com