शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
2
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
3
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
4
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
5
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
6
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
7
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
8
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
9
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
10
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
11
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

Maharashtra SSC Results 2018: दहावीचा निकाल 8 जूनला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2018 2:39 PM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे.

पुणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. ८) ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता मंडळाच्या संकेतस्थळावर निकाल पाहता येईल. मागील काही दिवसांपासून दहावी निकालाबाबत सोशल मिडियावर विविध तारखा व्हायरल होत होत्या. अखेर मंडळाने शुक्रवारी निकाल लावण्यात येणार असल्याचे जाहीर केले. परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळालेले गुण तीनपैकी कोणत्याही संकेतस्थळावर उपलब्ध होतील. या निकालाची विद्यार्थ्यांना प्रिंट घेता येईल. तसेच हा निकाल एसएमएस सेवेद्वारे मोबाईलवरही उपलब्ध होईल, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली.

शनिवारपासून गुण पडताळणीऑनलाइन निकालानंतर विद्यार्थ्यांना शनिवार (दि. ९) पासून गुण पडताळणी व छायाप्रतीसाठी अर्ज करता येईल. अर्जाचा नमुना मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरता येईल. गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावरील गुणपत्रिकेच्या स्वसाक्षांकित प्रतीसह ९ ते १८ जून या कालावधीत अर्ज करता येईल. तर ९ ते २८ जूनदरम्यान उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी अर्ज करावा लागेल.पुनर्मूल्यांकनाची सुविधाउत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी आधी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे आवश्यक आहे. ही छायाप्रत मिळाल्यानंतर दुस-या दिवसापासून पुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसात संबंधित विभागीय मंडळाकडे अर्ज करावा लागेल. विभागीय मंडळाकडे याविषयीची अधिक माहिती मिळेल.श्रेणीसुधारची संधीमार्च २०१८ परीक्षेमध्ये सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी दोन संधी दिल्या जाणार आहेत. त्यानुसार जुलै-ऑगस्ट २०१८ व मार्च २०१९ मध्ये होणा-या परीक्षा देता येतील. श्रेणी किंवा गुणसुधार योजना २००८ पासून उपलब्ध करून देण्यात आली आहे.या वेबसाइटवर पाहता येणार निकाल

  • www.mahresult.nic.in
  • www.result.mkcl.org
  • www.maharashtraeducation.com
  • www.rediff.com/exams
  • http://maharashtra10.jagranjosh.com  

कसा पाहाल निकाल?दहावीचा निकाल पाहण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील. समजा तुमचा नंबर P123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात P123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.

टॅग्स :SSC Results 2018दहावी निकाल २०१८examपरीक्षा