मुंबई : कुठल्याही चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती करताना ज्या विभागासाठी भरतीची जाहिरात असेल, त्याच विभागात नेमणुका देण्याचा नियम एसटी महामंडळात आहे. मात्र, एसटी महामंडळात एमकेसीएल संस्थेतर्फे २0१२ साली राज्यातील विविध विभागांत भरती झाली आणि ७२७ चालकांची मुंबई विभागातील कोकणमध्ये नेमणूक करण्यात आली. नियमबाह्य नेमणूक असल्याने परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी चालकांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले. तरीही एसटीच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात असल्याने त्या विरोधात ८ सप्टेंबरपासून आझाद मैदान येथे ७२७ चालक उपोषणाला बसणार असल्याची माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली. (प्रतिनिधी)
एसटीचे ७२७ चालक बसणार उपोषणास
By admin | Published: August 31, 2016 5:06 AM