शहरं
Join us  
Trending Stories
1
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
2
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
3
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
4
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
5
"राजानं प्रखर टीका सहन करुन चिंतन करायला हवं"; नितीन गडकरींचे मोठं वक्तव्य
6
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट
7
नवरी जोमात, नवरा कोमात! घरातून पळाली; बॉयफ्रेंडशी केलेल्या लग्नाचे पाठवले फोटो, पती म्हणतो...
8
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
9
कुमारी सैलजा भाजपमध्ये सामील होणार? मनोहर लाल यांनी दिले संकेत; म्हणाले, "वेळ आल्यावर सर्व समजेल"
10
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
11
धारावीमध्ये तणाव! मशिदीचा बेकायदेशीर भाग पाडण्यासाठी गेलेल्या पथकाला रोखलं, गाडीची तोडफोड
12
डिविडेंड, व्याजाच्या पेमेंटवर SEBI चे नवे नियम; Mutual Funds साठीही गूड न्यूज
13
IND vs BAN : ...म्हणूनच जग बुमराहची कॉपी करतं; बांगलादेशच्या खेळाडूनं सांगितलं यशाचं कारण
14
भाजप मावळमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मदत करणार; सुनील शेळकेंचा गंभीर आरोप
15
जबरदस्त कमबॅक! शतकी तोरा दाखवत पंतनं केली MS धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
16
"मंदिरांचं नियंत्रण हिंदू समाजाला मिळावं", तिरुपती लाडू प्रसादाच्या वादात विहिंपची मागणी
17
Sukesh Chandrasekhar : "बेबी गर्ल! कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं..."; जॅकलिनशिवाय जगणं महाठग सुकेशसाठी अवघड
18
आधी वन हँड सिक्सर! मग चक्क बांगलादेशची फिल्डिंग सेट करताना दिसला पंत (VIDEO)
19
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
20
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे

प्रवाशांच्या सेवेसाठी ‘ॲप’ली एसटी... क्लिकसरशी कळणार ठावठिकाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 9:36 AM

प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) ॲप तयार केले असून नोव्हेंबरपासून ते कार्यान्वित होणार आहे. 

मुंबई : एसटी स्टँडवर गेलो की गावाकडे जाणारी एसटी कुठे लागणार, आता ती आहे कुठे, यायला किती वेळ लागणार, गाडीत रिझर्व्हेशन किती इ. इ. माहिती आता प्रवाशांना एका क्लिकसरशी मिळणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने (एमएसआरटीसी) ॲप तयार केले असून नोव्हेंबरपासून ते कार्यान्वित होणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने एसटी प्रवास प्रवासीपूरक बनविण्यासाठी शिवसेना- भाजप महायुती सरकारच्या काळात, ऑगस्ट, २०१९ मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी एसटी गाड्यांमध्ये व्हीटीएस कार्यान्वित करण्याची घोषणा केली होती. कोरोना आणि एसटी संप यांमुळे हा प्रकल्प रखडला होता. प्ले स्टोअरवर ‘एमएसआरटीसी कम्युटर ॲप’ उपलब्ध आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेत हे ॲप प्रवाशांना वापरता येईल.

ॲपमध्ये काय?- ॲपमध्ये तिकीट आरक्षण, लोकेशन ट्रॅकिंग, बस मार्ग, महिला सुरक्षितता, मार्गस्थ गाडीत झालेला बिघाड, वैद्यकीय मदत आणि अपघात या आणीबाणीच्या वेळी प्रवाशांना मदतीसाठी सुविधा देण्यात आलेली आहे. 

- एसटी नियंत्रण कक्ष, पोलिस, रुग्णवाहिका यांना थेट फोन करण्याची सुविधाही या ॲपमध्ये असेल. 

प्रवाशांच्या भविष्यातील गरजा ओळखून तंत्रज्ञानाच्या मदतीने एसटी सेवांमध्ये प्रवाशांच्या हिताचे बदल करण्यात येत आहे. प्रवाशांना एसटीचा नेमका ठावठिकाणा समजण्यासाठी आणि इतर सुविधांसाठी हे ॲप तयार केले आहे. मात्र, प्रत्यक्षात ॲपसाठी नोव्हेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.- शेखर चन्ने, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

- एसटी प्रवाशांना ऑनलाइन अभिप्राय देण्याची सुविधाही या ॲपमध्ये असेल.- तक्रारींमध्ये ‘वाहक-चालक’, ‘बसस्थिती’, ‘बससेवा’, ‘ड्रायव्हिंग’, ‘मोबाइल ॲप’ असे वर्गीकरण या भागात केले जाईल.- प्रवाशांनी संबंधित विषयाबाबत तक्रार देताना मोबाइल क्रमांक आणि वाहन क्रमांक ऑनलाइन नोंदवावा लागेल. 

टॅग्स :State Governmentराज्य सरकार