मुंबई : महिला सन्मान योजनेंतर्गत अवघ्या महिन्याभरात तब्बल ४ कोटी २२ लाख महिलांनी अर्ध्या तिकिटात एसटीचा प्रवास करून अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. केवळ महिला सन्मान योजनेमुळे एसटीच्या दैनंदिन प्रवासी संख्येत ६ लाखांची भर पडली असून, सर्वाधिक प्रतिसाद कोल्हापूर विभागात मिळाल्याचे दिसून येत आहे. कोल्हापूर विभागात एका महिन्यात तब्बल ३० लाख २४ हजार महिलांनी प्रवास केला. सध्या दैनंदिन सरासरी १४ लाखांहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बस तिकीटदरांत ५० टक्के सवलत देण्याची घोषणा झाली होती. त्या अनुषंगाने दिनांक १७ मार्चपासून ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे.
ST Bus: एसटीचा ‘सन्मान’... ४ कोटी महिलांचा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2023 8:58 AM