कळमनुरी (जि. हिंगोली) : चालकाऐवजी वाहक बस चालवत असल्याने अहमदनगर-उमरखेड ही एस.टी. उलटून चालक-वाहकासह तब्बल २८ प्रवासी जखमी झाले. यातील ११ जण गंभीर असून त्यांच्यावर नांदेड, हिंगोलीत उपचार सुरू आहेत. माळेगाव ते झरा गावादरम्यान शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.उमरखेड आगाराची ही बस अहमदनगरहून उमरखेडकडे जात होती. कळमनुरी तालुक्यातील माळेगाव येथे चालक किशोर लोके यांच्याऐवजी वाहक सुभाष पवार यांनी गाडी ताब्यात घेतल्याचे प्रशावांनी सांगितले. जवळपास तीन ते चार कि.मी. अंतर पार गेल्यानंतर सुसाट वेगाने बस चालविणाºया पवारचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली. रस्त्याच्या बाजूला लिंबाचे झाड असल्याने तेथे ही बस अडकली. अपघातानंतर प्रवाशांनी आरडाओरड केल्याने एकच गोंधळ उडाला. बाजूच्या शेतात काम करणाºयांनी जखमींना मदत केली. पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. पोलिसांनी समोरच्या व पाठीमागच्या काचा फोडून प्रवाशांना बाहेर काढले....तर कारवाई-आगारप्रमुखया घटनेबाबत प्रवाशांसह चालक-वाहकांची जवाब नोंदविले जातील. चालकाऐवजी वाहक बस चालवत असल्यास ही गंभीर बाब असून चौकशीत तसे आढळल्यास कारवाई केली जाईल, असे कळमनुरीचे आगारप्रमुख सिद्धार्थ आझादे यांनी सांगितले.
वाहकच चालक बनल्याने एसटी बस उलटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 3:59 AM