मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने घोषित केलेली १८ टक्के भाडेवाढ गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. डिझेलचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनकरारामुळे एसटीच्या प्रशासकीय खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे नाइलाजास्तव ही तिकीट दरवाढ करण्यात येत असल्याचे एसटी महामंडळाने कळविले आहे.सुट्ट्या पैशांचा वाद मिटविण्यासाठी एसटी महामंडळाने पाचच्या पटीत तिकीट आकारण्याच्या निर्णय घेतला आहे. परिणामी, ७ रुपयांच्या तिकिटांसाठी ५ रुपये आणि ८ रुपयांच्या तिकिटांसाठी १० रुपये आकारण्यात येतील, अशी माहिती महामंडळाने दिली.
आज मध्यरात्रीपासून एसटीची भाडेवाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 6:24 AM