लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : लॉकडाउन काळात अत्यावश्यक सेवा देणाºया कर्मचाऱ्यांसाठी एसटी महामंडळाने बस सेवा सुरू केली आहे. मात्र एसटीचे कर्मचारी दांडी मारत असल्याने महामंडळाला सेवा सुरळीत ठेवण्यात अडचणी येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होईल या भीतीमुळे २२ चालकांसह ७०६ वाहकांनी कामाकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे.
एसटी महामंडळाकडून मुंबई, पालघर, ठाणे या विभागांतून अत्यावश्यक सेवा दिली जात आहे. अत्यावश्यक सेवा देणाºया चालक-वाहकांना कोरोनाची लागण होऊ नये, यासाठी मास्क, सॅनिटायझर दिले जात आहे. याशिवाय त्यांना ३०० रुपये प्रोत्साहन भत्ताही जाहीर केला आहे. तरीही अत्यावश्यक सेवा देण्याऐवजी अनेकांनी कोरोनाच्या भीतीने या सेवेकडे पाठ फिरविली आहे.
कामाला दांडी मारणाºया कर्मचाºयांमध्ये मुंबई, ठाणे, कुर्ला नेहरूनगर, परळ, पनवेल, उरण येथील ६२२ चालक, तर ७०६ वाहकांचा समावेश आहे. दांडी मारणाºयांमध्ये कायमस्वरूपी; तसेच हंगामी व रोजंदारीवरील एसटी चालक, वाहक आणि कायम चालक तथा वाहकांचा समावेश आहे.२१ कर्मचाºयांवर कारवाईएसटी महामंडळातील मुंबई, पालघर, ठाणे या तीन विभागांतील एकूण२१ कर्मचाºयांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एसटीच्या एका अधिकाºयाने दिली. हंगामी आणि रोजंदारीवर असलेल्यांची बडतर्फी करण्याचा विचार सुरू असल्याचे समजते.