मुंबई : प्रसाधनगृहांची बिकट अवस्था, स्थानकात असलेली दुर्गंधी, प्रवाशांसाठी व चालक-वाहकांसाठी आरामदायी नसलेल्या रेस्ट रूम व माहितीचा अभाव. एसटीच्या स्थानकांवर असलेली ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. एसटी स्थानकांवर ‘आधुनिक बस तळांसह व्यापारी संकुल’ उभारण्याचा निर्णय महामंडळाने घेतला असून, सुरुवातीला नऊ स्थानकांवर हा प्रकल्प राबविला जाईल. त्याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली. नऊ स्थानकांचे विकासकाम पूर्ण झाल्यावर, ‘एअरपोर्ट’सारखाच (विमानतळ) अनुभव एसटी प्रवाशांना यातून मिळेल.एसटी महामंडळाचा राज्यात मोठा पसारा असून, २५0 आगार, ५६८ बस स्थानके, १८ हजार बसेस व वर्षाला ६५ लाखांपर्यंत प्रवासी आहेत. खासगी बस कंपन्यांनी निर्माण केलेली स्पर्धा आणि एसटीची वर्षानुवर्ष न बदललेली परिस्थिती, त्यामुळे एसटीपासून गेल्या पाच वर्षांत १५ कोटी प्रवासी दुरावले. मात्र, आता प्रवाशांना पुन्हा आकर्षित करण्यासाठी एसी बसेस ताफ्यात दाखल करतानाच ‘एअरपोर्ट’च्या धर्तीवर एसटी बस स्थानकांचाही विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी आधुनिक बस स्थानकांसह व्यापारी संकुल उभारले जाईल.या प्रकल्पाद्वारे प्रथम नऊ स्थानकांचा विकास केला जाणार असून, त्यामध्ये पनवेल, बोरीवली नॅन्सी कॉलनी, पुण्यातील शिवाजीनगर, सोलापूरमधील पुणे नाका, नाशिक-महामार्ग, औरंगाबाद-मध्यवर्ती, नांदेड-मध्यवर्ती, अकोला, मोरभवन-नागपूरचा समावेश आहे. आता एसटीकडून निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती एसटीकडून देण्यात आली. खासगी-सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर प्रकल्प राबविला जाईल. प्रकल्पानुसार, येणाऱ्या व जाणाऱ्या बसेसाठी तळघर उभारले जाईल. त्यानंतर, साधारपणे त्यावरील पहिल्या मजल्यावर प्रवाशांसाठी बसण्याची व्यवस्था केली जाईल. जेणेकरून, येणाऱ्या व सुटणाऱ्या बसची माहिती येथे त्यांना प्राप्त होईल. त्याला लागूनच एसटीची कार्यशाळाही असेल. प्रवासी, तसेच चालक-वाहकांसाठी रेस्ट रूमही उभारतानाच प्रवाशांसाठी शॉपिंग मॉल, सिनेमागृह, रेस्टॉरंटही इत्यादी सोईसुविधाही उपलब्ध असतील. स्थानकाबाहेर पडताच, प्रवाशांना तत्काळ टॅक्सी व रिक्षा मिळावी, त्याप्रमाणेही रचना करण्यात येईल. (प्रतिनिधी)सर्व खर्च विकासकांकडूनच्विकासकाकडून प्रकल्पाचा संपूर्ण खर्च केला जाईल. साधारपणे ३0 वर्षांच्या भाडेतत्त्वानंतर तो विनामूल्य एसटी महामंडळाला हस्तांतरित केला जाईल. महत्त्वाची बाब म्हणजे, यातून महामंडळाला हजारो कोटींचे अधिमूल्य मिळणार असून, त्यामुळे महामंडळाच्या तिजोरीत मोठी भर पडेल. च्एसटी महामंडळाने एकूण १३ स्थानके आधुनिक बस तळांसह व्यापारी संकुलासाठी निवडली आहेत. यातील नऊ स्थानकांचे डिझाइन तयार करण्यात आले आहे, तर उर्वरित चार स्थानकांचा अभ्यास सुरू आहे.बस स्थानकांचे वापरले जाणारे भूखंड क्षेत्रफळपनवेल १६ हजार चौरस मीटरबोरीवली नॅन्सी कॉलनी२४ हजार चौरस मीटरपुणे-शिवाजीनगर १५,७00 चौरस मीटरसोलापूर-पुणे नाका१५,२६६ चौरस मीटरनाशिक महामार्ग३0,९00 चौरस मीटरऔरंगाबाद-मध्यवर्ती१६,७८७ चौरस मीटरनांदेड-मध्यवर्ती३६,५00 चौरस मीटरअकोला१७,५00 चौरस मीटरमोरभवन-नागपूर१0,४८१ चौरस मीटरबस स्थानकांचा विकास केला जाणार असून, हा मोठा प्रकल्प आहे. त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. याद्वारे बऱ्याच सुविधा दिल्या जातील. - रणजित सिंह देओल, एसटी महामंडळ-व्यवस्थापकीय संचालक
एसटी स्थानके होणार आधुनिक
By admin | Published: January 09, 2017 4:56 AM