मुंबई - पगारवाढीसह इतर मागण्यासाठी राज्यातील एस कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून अघोषित संप पुकराला आहे. अचानक काम बंद केल्याने सुट्टीवरुन घरी परतणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होण्याची शक्यता आहे. हा संप कोणत्याही संघटनेने पुकारलेला नाही, त्यामुळे हा संप अघोषित असल्याने, एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संपाबद्दल संभ्रम आहे. ७ जून मध्यरात्रीपासून अन्यायाविरुद्ध सर्वांनी एकत्र या हक्कासाठी एकत्र लढा, कामगार एकजुटीचा विजय असो’ अशा आशयाचे पोस्टर मागिल दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याचबरोबर ऑडिओ क्लिपदेखील व्हायरल झाली होती यात ७ जूनच्या मध्यरात्रीपासून संप करण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. सकाळपासूनच कर्मचाऱ्यांनी अघोषित संप पुकराला आहे. यापूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी दिवाळीत संप केला होता. गेल्या संपात ज्या दोन संघटना आघाडीवर होत्या त्याच संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून संपाबाबत तोंडी आदेश देण्यात आल्याची चर्चा आहे.
LIVE UPDATES :
भिवंडी एस .टी.कर्मचाऱ्यांचा वाद पोलीस ठाण्यात. बसेस आगाराबाहेर उभ्या असताना शिवसेना प्रणीत कामगार संघटनेच्या सदस्यांचा संप यशस्वी नसल्याचा दावा.
सिंधुदुर्ग : एसटी कर्मचारी संपामुळे प्रवाशांचे अतोनात हाल, सिंधुदुर्गात सकाळी 10 वाजेपर्यंत एकूण 467 पैकी 464 एसटी फेऱ्या झाल्या रद्द, कणकवली डेपोच्या 163 पैकी 162, , कुडाळ 89 पैकी 88 , सावंतवाडी 52 पैकी 52 , मालवण 44 पैकी 44 , देवगड 47 पैकी 47 , विजयदुर्ग 14 पैकी 14 , वेंगुर्ले 58 पैकी 57 फेऱ्या झाल्या रद्द.
जळगाव - जामनेरला एसटी संपाने प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. बस स्थानकावर शुकशुकाट, ट्रँव्हल, रिक्शा व कालिपीलीने प्रवासासाठी प्रवाशांची गर्दी. तालुक्यातील पहुर, नेरी, फत्तेपुर, शेंदुर्णी, तोंडापुरला बस थांब्यावर प्रवाशांची गर्दी. तर चाळीसगाव येथे पोलिस बंदोबस्तात बसफे-या सुरू...
नवी मुंबई-वाशी हायवे येथील एसटी बस थांब्यावर पोलीस बंदोबस्त
- सर्वसामान्यांना वेठीस धरणे चुकीचे
मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणे चुकीचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ जाहीर करण्यात आलेली आहे. अघोषित संपाबाबत रात्री दक्षतेचा इशारा मिळाला होता. वेतनवाढीचे राजकारण करणाऱ्यावर कारवाई करण्यात येईल.- रणजित सिंह देओल, उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांचे हाल, बुलडाणा जिल्ह्यात संपामुळे 850 कर्मचारी संपात सहभागी
खामगाव : कोणतीही पूर्व सूचना न देता एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री पासून पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहेत. राज्य परिवहन महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ फसवी असल्याचा आरोप करीत वेतनवाढ मान्य नसल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. मध्यरात्रीपासून बससेवा बंद झाल्याने सकाळी कामावर जाणाऱ्यांची पंचाईत झाली. विद्यार्थी वेळेत शाळेत जाऊ शकले नाही. खामगाव, मलकापूर, जळगाव, बुलडाणा, शेगाव, मलकापूर, चिखली या आगारातील सुमारे 850 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
- कामावर या अन्यथा निलंबन; एसटी महामंडळ झाले आक्रमक
भोकरमध्ये दोन बसवर दगडफेक; एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण
- यवतमाळ : एसटी कामगारांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्यात पांढरकवडा आगार येथे संमिश्र बाबद। इतर ठिकाणी सुरळीत सुरु आहे
- डोंबिवली- कल्याण आगरातून आतापर्यत 40 बसेस निघाल्या असून त्या सर्व रूटवर गेल्या आहेत- प्रतिभा भांगरे, कल्याण आगार प्रमुख.
- धुळे- एस.टी. कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाला धुळ्यात सकाळी संमिश्र प्रतिसाद मिळत होता.संपामुळे स्थानकावर बसेस उभरत्या होत्या. पण काही बसेस मात्र सुरू होत्या. त्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला.संपात सहभागी कर्मचारी मात्र सुरू असलेल्या बस बंद करण्याच्या प्रयत्नात होते.
- डोंबिवली अपडेट्स- विठ्ठलवाडी बस डेपो मध्ये सकाळपासून लांबपल्याच्या 15 गाड्या सोडण्यात आल्या असून 6 रद्द करण्यात आल्या आहेत. - आर.व्ही. जाधव, विठ्ठलवाडी आगार
- एसटी संपाचा इफेक्ट कल्याण मध्ये अद्याप नाही, माहितीनुसार भिवंडी आणि शहापूर बस स्टँड मध्ये प्रभाव जाणवत आहे. - संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी,कल्याण.
- जळगाव : एस.टी. कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपाला जळगावात संमिश्र प्रतिसाद. संपामुळे स्थानकावर 30 बसेस उभ्या आहेत. काही बसेस मात्र रवाना झाल्या. अचानक पुकारलेल्या संपामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.
- अकोल्यात संपाचा सध्यातरी परिणाम नाही सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या नेहमीच्या वेळेत निघाल्या.
- नाशिक डेपोत बसेस थांबलेल्याच.
- नगर जिल्ह्यातील 11 डेपोतून एकही बस सुटली नाही.
- सोशल मीडियावरील मेसेजमुले संभ्रम.
- सिंधुदुर्गात एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांची तारांबळ.
- कर्जत, माणगाव, उरण येथील आगातरात काही बसेस अडकल्या.
- रायगड जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संपाचा प्रवाशांना फटका.
- संपामुळे सांगली स्थानकात प्रवाशी खोळंबले.
- पुणे स्थानकातही एसटी बसेस आगारात.
- भंडाऱ्यात सातनंतर एकही बस निघाली नाही.
- परळ स्थानकात एनेक एसटी बसेस अगारातच.
- सांगली जिल्ह्यात शिवशाही शिवाय सर्व बसेस बंद.
- एसटी कर्मचार्यांच्या संपाचा औरंगाबाद मध्यवर्ती बसस्थानकावर कुठलाही परिणाम नाही. सर्व मार्गावरील बसेस नियमित सुरु.
- औरंगाबादच्या सिडको स्थानकातून बससेवा सुरळीत.
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा. पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी. जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही, तोपर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी.