शहरं
Join us  
Trending Stories
1
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
2
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
3
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
4
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
5
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
6
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
7
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
8
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
9
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
10
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
11
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
12
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
13
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
14
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...
15
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
16
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
17
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
18
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
19
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
20
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!

एसटीला झाला आठशे कोटींचा तोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2020 5:50 AM

एसटीकडूनही टोल टॅक्स तसेच प्रवासी करही वसूल केला जातो.

मुंबई : एसटी महामंडळामधील बसचा वाढलेला देखभालीचा खर्च, इंधन खर्च, कर्मचाऱ्यांचे पगार आणि तिकीट दरवाढीत मर्यादा यामुळे एसटी महामंडळ तोट्यात आहे. त्यामुळे एसटीचा २०१९-२० यादरम्यान संचित तोटा सुमारे पाच हजार कोटींवर पोहोचला आहे. यात भर म्हणून आगामी वर्षात एसटीला सुमारे आठशे कोटींचा तोटा होण्याची भीती अर्थसंकल्पात व्यक्त केली आहे.

एसटीकडूनही टोल टॅक्स तसेच प्रवासी करही वसूल केला जातो. त्याचवेळी एसटीला विविध घटकांना सवलतीच्या दरात तिकिटे द्यावी लागतात. त्याची नुकसानभरपाई एसटीला केली जात नाही. तसेच, इंधनावरही राज्य सरकार कर आकारते. याचा थेट परिणाम एसटीच्या संचित तोट्यावर पडत आहे. एसटीचा सर्व बाजूने खर्च वाढत असला तरी, एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत आहे. याचा थेट परिणाम एसटीच्या आर्थिक तोट्यात होतो. ही तूट भरून काढण्यासाठी एसटी प्रशासन कमी पडत आहे, असे मत एसटी कामगारांचे आहे. २०१९-२० यादरम्यान संचित तोटा सुमारे पाच हजार कोटींवर पोहोचला. एसटी प्रवासी वाढीदरम्यान एसटी प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे एसटीचा विस्तार खुंटला आहे.मागील तोट्यापेक्षा ०.२४% घट अपेक्षितराज्य परिवहन महामंडळाचा २०२०-२१ चा अर्थसंकल्प (अंदाजित) जाहीर झाला आहे. यामध्ये एसटीला १० हजार ४६७ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे. या अर्थसंकल्पात एसटीला ८०२.०३ कोटींचा तोटा अपेक्षित आहे. २०२०-२१ च्या अर्थसंकल्पात ९ हजार ६६५.१४ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे. तर, ८०२.०३ कोटी रुपये तोटा होणे अपेक्षित आहे. मात्र तोटा २०१९-२० सुधारित अर्थसंकल्पात ८०३.५० कोटी रुपये होता. त्यामुळे मागील वर्षाच्या तोट्यापेक्षा ०.२४ टक्के इतकी घट अपेक्षित आहे.

टॅग्स :Bus DriverबसचालकMumbaiमुंबई