शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

एसटी होणार ‘चकाचक’

By admin | Published: October 17, 2016 4:27 AM

एसटी महामंडळाने स्वच्छतेसाठी राज्यातील सर्व स्थानकांत सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई : एसटी स्थानकांमध्ये असलेली अस्वच्छता, धुळीने माखलेल्या बसेस, प्रसाधनगृहांमध्ये असलेली अस्वच्छता व दुर्गंधी, चालक-वाहकांच्या रेस्ट रूमचीही झालेली दुरवस्था पाहता, एसटी महामंडळ स्वच्छतेला गांभीर्याने घेणार का, असा सवाल उपस्थित होत होता. याची गांभीर्याने दखल घेत आणि प्रवाशांकडून केल्या जाणाऱ्या सूचनांनुसार एसटी महामंडळाने स्वच्छतेसाठी राज्यातील सर्व स्थानकांत सफाई करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी खासगी संस्था किंवा कंपन्यांना काम दिले जाणार असून, निविदा प्रक्रिया सुरू आहे. २0१७ च्या जानेवारीपासून सर्व स्थानकांत स्वच्छतेसाठी संस्था किंवा कंपन्यांची नेमणूक केली जाईल, अशी माहिती एसटीतील सूत्रांकडून देण्यात आली. एसटी महामंडळाकडे १७ हजार बसेस, १५0 आगार आणि ५६८ स्थानके आहेत. यातील सर्व स्थानकांत असलेल्या प्रसाधनगृहांची कामे खासगी संस्थेला, तर काही मोजक्याच स्थानकांतील स्वच्छतेची कामेही संस्था, तसेच कंपन्यांना देण्यात आली आहेत. मात्र, नेमण्यात आलेल्या संस्थांकडून स्थानके आणि प्रसधानगृहांत स्वच्छता होताना दिसत नाही, तर बसेसमधील असलेल्या अस्वच्छतेमुळे प्रवाशांकडून नाराजी व्यक्त केली जाते. प्रवाशांसाठी असणाऱ्या प्रसाधनगृहांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, त्यांच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याचे महामंडळाच्या निदर्शनासही आले आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने ५६८ स्थानकांतील स्वच्छतेवर भर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कामासाठी ‘आउटसोर्सिंग’करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. स्वच्छतेची कामे ही संस्था, तसेच कंपन्यांना देण्यात येतील. ही कामे देण्यासाठी निविदा प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. २0१७ च्या जानेवारी महिन्यापासून सर्व स्थानकांत संस्था, तसेच कंपन्यांची नेमणूक केली जाईल. साधनसामुग्री ही एसटीकडून पुरविण्यात येईल, तर मनुष्यबळ हे संस्थांकडून देण्यात येईल. स्थानकांतील सफाई करतानाच, कार्यालये, बसेस, चालक-वाहकांची रेस्ट रूम, प्रसाधनगृहे इत्यादी सफाई करण्यावर भर दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले. स्वच्छतेअभावी प्रवासी दुरावले जात असल्याने, त्या भीतीपोटी महामंडळाने १ मेपासून राज्यातील आगार, बस स्थानके, प्रसाधनगृहांची स्वच्छता करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी १ मेपासून स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. स्थानकांवरील प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेचे काम हे खासगी संस्थांकडे आहे. त्याची स्वच्छता समाधानकारक न झाल्यास, खासगी संस्थांवर कारवाई करण्याचा इशाराही एसटी महामंडळाकडून देण्यात आला होता. प्रसाधनगृहांच्या अस्वच्छतेबाबत प्रवाशांकडून कोणतीही तक्रार येणार नाही, याची खबरदारी आगारप्रमुख आणि आगार व्यवस्थापकांना घेण्यास सांगितले होते. त्यानंतर मात्र, पुन्हा तीच परिस्थिती स्थानक आणि बसमध्ये दिसून आली. (प्रतिनिधी)> ई-सेवामधून आरक्षणइंद्रधनू आरक्षण प्रणाली अंतर्गत ग्रामिण भागातील सर्वसामान्य प्रवाशांना एसटीचे बसचे आगाऊ आरक्षण उपलब्ध व्हावे या दृष्टिने इतर शासकीय सेवांप्रमाणे महा ई-सेवा केंद्रातून एसटी तिकीटाची आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. या योजनेअंतर्गत सध्या कार्यरत असलेलया मे.महा आॅनलाईन लिमिटेड कंपनीच्या ५,८00 ई-सेवा केंद्रातून तहसिल कार्यालय व पंचायत समिती कार्यालयातील विविध दाखल्याप्रमाणे इच्छित प्रवासाचे तिकीट काढता येणे शक्य होईल.