शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

स्टार्सच्या हेअरकटचा स्टायलिश ट्रेंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2017 9:43 PM

आॅनलाईन लोकमत /नवनाथ खराडे अहमदनगर, दि. 18 - स्टार्सच्या स्टाईलला फॉलो करीत केसांची आकडे काढणारी, दाढीला वेगवेगळी वळणे देणाऱ्या हेअरकटचा ...

आॅनलाईन लोकमत /नवनाथ खराडे

अहमदनगर, दि. 18 - स्टार्सच्या स्टाईलला फॉलो करीत केसांची आकडे काढणारी, दाढीला वेगवेगळी वळणे देणाऱ्या हेअरकटचा स्टायलिश ट्रेंड आता खेडोपाडीही रुजू लागला आहे़ या स्टायलिश ट्रेंडला कलरिंगने अधिक चकाकी लाभल्यामुळे १४ ते २२ वर्ष वयोगटाच्या यंगिस्तानने हा न्यू ट्रेंड अक्षरश: डोक्यावर घेतला आहे़पूर्वी चित्रपटातील हिरोची हेअरस्टाईल करण्याकडे तरुणाईचा कल असायचा़ मात्र, आता क्रिकेटची लोकप्रियता शिगेला पोहोचल्यामुळे क्रिकेटर्सची हेअर स्टाईल आपल्या डोक्यावर चढविण्याची जणू स्पर्धाच तरुणाईमध्ये लागल्याचे पहावयास मिळत आहे़ तरुणाईचा कल पाहूनच यंदाच्या आयपीएलच्या सामन्यांमध्ये मोस्ट स्टायलिश प्लेअर हा अवॉर्ड सुरु झाल्याचे सांगण्यात येते़ तथापि, तरुणाईमध्ये विराट कोहली, रविंद्र जडेजा, हार्दिक पांड्या, अ‍ॅडम झंपा, युवराजसिंग यांच्यासारखी हेअरस्टाईल तरुणामध्ये लोकप्रिय झाली आहे़ सद्यस्थितीत हेअरकटचे विविध प्रकार असले तरी त्यामधील सर्वात जास्त वन साईड कटला युवक प्राध्यान देत आहेत. यामध्ये कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. वन साइड कटमध्ये एका बाजूचे केस कमी केले जातात. उर्वरित केस दुसऱ्या बाजूला वळविले जातात. टू साइड कटमध्ये दोेन्ही बाजूचे केस कमी करुन मधले केस कमी- जास्त ठेवले जातात. ग्रास कटमध्ये केस उभे ठेवले जातात. युनिफॉर्म कटमध्ये सर्व केस एकसारखे कापले जातात. गॅ्रज्यूएशन कटमध्ये केसांना स्लोप दिला जातात. या कटवरच तरुणाई समाधान मानत नाही तर जोडीला केसांना कलरिंगही केले जाते. झॅकपॅक हेअरकट केल्यानंतर त्यावर कलरची फिनिशिंग करुन लूक चेंज करण्याकडेही अनेकांचा कल वाढत आहे़ कलरिंगमध्ये हायलाईट, लो-लाईट, ग्लोबल व टचअप हे महत्वाचे प्रकार आहेत. हायलाईटमध्ये डार्क केसांच्या काही बट लाईट कलर केल्या जातात. लोलाईट प्रकारात लाईट केसांमध्ये काही बट डार्क केल्या जातात. ग्लोबल प्रकारात सर्व केसांना एकसारखा कलर केले जाते. रुट टच अप प्रकारात दोन-तीन महिन्यांपूर्र्वी कलर केले असल्यास फक्त केसांच्या मुळांना कलर केले जाते. डार्क प्रकारात ब्लॅक, डार्क ब्राऊन, ब्राउन, लाईट ब्राऊन हे कलर वापरण्यास तरुणाई पसंती देत आहे. लाईटमध्ये ब्लॉड, लाईट ब्लॉड, व्हेरी लाईट ब्लॉड असे कलरही तरुणाईला भावत आहेत़ हायलाईटमध्ये रेड, रेड व्हायलेट, चॉकलेट, वॉर्म व अ‍ॅश कलरने तरुणाईला भुरळ पाडली आहे़ केसांना आणखी स्टायलिश करण्यासाठी कलरशिवाय आणखी बाबीचा वापर तरुणाई करत आहे. त्यामध्ये जेलचा वापर केला जातो. केसांना उभे किंवा कडक ठेवण्यासाठी जेल उपयोगात आणले जाते. तसेच व्हॅक्स, प्लाय, मूस याचाही उपयोग केसांना चमकदार बनवण्यासाठी व लूक देण्यासाठी वापर केला जातो. हेअर स्प्रेचा वापर करुन हव्या त्या दिशेला केस वळविले जातात. तसेच धुळीपासून, उन्हापासून संरक्षण करण्यासाठी सिरमचा वापर तरुणाई करते. सिरममुळे केसांमध्ये गुंता होत नाही. याशिवाय दररोज केसांच्या काळजीसाठी शाम्पू, कंडिशनर, स्पा व कलरकेअरचाही वापर केला जातो. आधुनिकतेबरोबर कटींगच्या व्यवसायातही मोठे बदल झाले आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या कटची मागणी केली जाते. त्यानुसार आम्ही सेवा देतो. स्टायलिश व कलरिंगचे सर्र्वाधिक प्रमाण तरुणाईमध्ये आहे़ अनेकजण व्यक्तिमत्व चांगले दिसण्यासाठी स्टायलिश कटींगला पसंती देतात़ नगरमध्ये हे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असे हेअर डिझायनर सागर औटी यांनी सांगितले़

https://www.dailymotion.com/video/x844z7u