शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

एसी मुंबई दर्शन बससेवेचा आरंभ

By admin | Published: August 12, 2016 4:14 AM

जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची आणि त्या पाहण्याची इच्छा असते. ‘मुंबई दर्शन’ या वातानुकूलित बसमुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनातील मुंबईच्या दर्शनाची

मुंबई : जगातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची आणि त्या पाहण्याची इच्छा असते. ‘मुंबई दर्शन’ या वातानुकूलित बसमुळे प्रत्येक व्यक्तीच्या मनातील मुंबईच्या दर्शनाची इच्छा पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी केले. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) व बेस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या ‘मुंबई दर्शन सहल’ या वातानुकूलित बसचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पर्यटनमंत्री जयकुमार रावल, पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार, अभिनेत्री जुही चावला, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर-सिंह, पर्यटन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक सतीश सोनी यांच्यासह अर्जेटिना, श्रीलंका, बांगलादेश, इथिओपिया, मॉरिशस या देशांचे राजदूत, उद्योजक आदी उपस्थित होते.पर्यटनाला उत्तेजन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुंबई दर्शन या वातानुकूलित बसचे दर कमी आहेत. सामान्य माणसालाही परवडतील असे हे दर आहेत. त्यामुळे हा उपक्रम अत्यंत चांगल्याप्रकारे चालेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त करून त्यांनी पर्यटनमंत्री व राज्यमंत्री यांचे अभिनंदन केले. पर्यटनामुळे विकास दरात वाढ होते तसेच पर्यटन हे राजदूताचे महत्त्वाचे कार्य करते. या बसमुळे मुंबईतील सर्व महत्त्वाच्या प्रेक्षणीय स्थळांची माहिती जगभरात जाईल. पर्यटनातील गाइड हा महत्त्वाची भूमिका करत असतो. कारण त्याच्यामुळेच सर्व देश-विदेशी पर्यटकांना सर्व प्रेक्षणीय स्थळांची महत्त्वपूर्ण माहिती दिली जाते, असेही ते म्हणाले. तर मुंबई दर्शन वातानुकूलित बस ही मुख्यमंत्र्यांच्या ‘व्हिजीट महाराष्ट्र-२०१७’ची नांदी असून त्यादृष्टीने पर्यटन विभागाने पहिले पाऊल टाकले आहे. जगासमोर मुंबईची ओळख दाखविण्याचा हा प्रयत्न आहे. राज्यात नागपूर, औरंगाबाद, पुणे येथेही अशा प्रकारे दर्शन बस सुरू करण्याचा मानस असल्याचे पर्यटनमंत्री जयकुमार रावल म्हणाले. मुख्यमंत्र्यांसह, मंत्री, राज्यमंत्री, आमदार, मुख्य सचिव, अधिकारी, उद्योजक, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार तसेच विद्यार्थी यांनी आज पहिल्या दिवशी ‘वातानुकूलित मुंबई दर्शन बस’मधून काही प्रेक्षणीय स्थळांना भेट दिली. (प्रतिनिधी)