ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. २७ - भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे साहित्य विश्वातील एक महान कवी रवींद्रनाथ टागोर यांनी बंगाली भाषेत लिहिलेल्या ‘चित्तो जेथा भयशून्य’ या कवितेच्या अभिवाचनातून त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांनी लिहिलेल्या कथा, कविता, गाणी तसेच साकारलेल्या चित्र व शिल्पाच्या अभिवाचनाद्वारे जळगावकर रसिकांना त्यांच्या प्रत्यक्ष सहवासाची अनुभूती आली. याशिवाय बंगाली व मराठी या दोन विभिन्न; परंतु परस्पराशी समरस असलेल्या संस्कृतींचे दर्शनही रसिकांना झाले. निमित्त होते; परिवर्तन अभिवाचन महोत्सवाचे.जळगाव शहर सांस्कृतिकदृष्ट्या विकसित व्हावे, या उद्देशाने परिवर्तन संस्थेतर्फे २७ आॅगस्ट ते २ सप्टेंबर दरम्यान, मायादेवीनगरातील रोटरी भवनात आयोजित करण्यात आलेल्या ‘परिवर्तन अभिवाचन महोत्सवा’ला शनिवारी सायंकाळी ७ वाजता प्रारंभ झाला. अभिवाचन महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘चित्तो जेथा भयशून्य’ या कवितेचे अभिवाचन झाले.
जळगावात अभिवाचन महोत्सवाला थाटात प्रारंभ
By admin | Published: August 27, 2016 11:05 PM