ऑनलाइन लोकमत
शिर्डी, दि. १८ - पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा,साईसच्चरित्र ग्रंथ व विणा मिरवणुकीने तीन दिवस चालणाऱ्या साईनगरीतील शतकोत्तरी गुरूपौर्णिमा उत्सवाचा आज श्रीगणेशा झाला.पहाटे साईसमाधी मंदीरातुन ही मिरवणुक द्वारकामाई मंदीरात आली़ यावेळी कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे यांनी साईसच्चरित्र ग्रंथ, उपकार्यकारी अधिकारी डॉ़ संदीप आहेर व मंदीर प्रमुख राजेंद्र जगताप यांनी प्रतिमा तर मंदीर पुरोहित विलास जोशी यांनी विणा घेतला होता़ या मिरवणुकीनंतर द्वारकामाई मंदीरात अखंड साईसच्चरित्राचे पारायणाचा शुभारंभ झाला़ उद्या पहाटे या पारायणाची सांगता होणार आहे़ कार्यकारी अधिकारी बाजीराव शिंदे व सिमा शिंदे यांनी प्रथम तर उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर यांनी द्वितीय अध्यायाचे वाचन करून या उपक्रमाची सुरवात केली़सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत ह.भं प़ माधवराव आजेगावकर यांचे किर्तन झाले़ साडेसात वाजता के़स्वर्णश्री ,विजयवाडा यांचा कुचिपूडी नाट्य व साईभक्ती संगीत, रात्री नऊ वाजता पे्रमानंद कृष्णा कोचरेकर, गोवा यांचा गोमंतकालीन वैशिष्ठ्यपुर्ण घुमटावरील आरत्या हा कार्यक्रम समाधी मंदीरा शेजारील स्टेजवर संपन्न होईल .रात्री सव्वा नऊ वाजता श्रींच्या पालखीची गावातुन मिरवणुक काढण्यात येईल गुरूपौर्णिमा उत्सवा निमीत्त बंगलोर येथील भाविक के़ सी़ सुब्रमणी यांच्या देणगीतुन मंदीर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे़ या शिवाय मुंबई येथील साईराज डेकोरेटर्स यांनी मंदीर व परिसरात नयनरम्य विद्युत रोषणाई केली आहे़ हैद्राबादच्या साईभक्ताच्या देणगीतुन आज संस्थान प्रसादालयात मोफत अन्नदान करण्यात आले़.उद्या ,मंगळवार उत्सवाचा मुख्य दिवस असुन रात्री सव्वा नऊ वाजता शहरातुन रथ मिरवणुक काढण्यात येणार आहे़ तसेच मंदीर रात्रभर दर्शनासाठी खुले राहणार आहे़.