- हेमंत बावकर
विद्यार्थ्यांच्या व कंपन्यांच्या सोईसाठी केंद्र सरकारने पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे अपार आयडी काढण्याचा निर्णय घेतला आहे. शाळांमध्ये या योजनेचे फॉर्म भरून घेण्यास सुरुवातही झाली आहे. या आयडीवर विद्यार्थ्यांचे सर्व मार्कशीटसह इतर शैक्षणिक डॉक्युमेंट ठेवले जाणार आहेत. जे हरवले तर किंवा नोकरीवेळी पडताळणीसाठी कंपन्यांच्या उपयोगी येणार आहे.
अपार आयडी (APAAR ID) म्हणजेच ऑटोमॅटीक पर्मनंट एकेडमिक अकाऊंट रजिस्टर आयडी असे याचे नाव असणार आहे. डिजीलॉकर सारखेच हे अकाऊंट काम करणार आहे. या अकाऊंटमध्ये पहिलीपासून ते बारावीपर्यंतची सर्व शैक्षणिक कागदपत्रे अपलोड केली जाणार आहेत. याचा फायदा विद्यार्थ्यांना शालेय जीवनात तसेच नोकरीवेळी देखील होणार आहे.
या अपार आयडीचे रजिस्ट्रेशन मुलांच्या शाळांमध्येच करण्यात येणार आहे. यासाठी शाळांना पालकांचे ना हरकत प्रमाणपत्र लागणार आहे. पालकांचे व मुलाचे आधार कार्ड, पॅन किंवा मतदान ओळखपत्राचा वापर यासाठी केला जाणार आहे. apaar.education.gov.in या वेबसाईटवर याचे रजिस्ट्रेशन होणार आहे.
एका शाळेतून दुसऱ्या शाळेत ट्रान्सफर होताना, एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील शाळेत जाताना किंवा मार्कशीट हरवले तर याचा वापर करता येणार आहे. ही माहिती शिक्षणसंस्था, नोकरी देणाऱ्या संस्थांसोबत शेअर केली जाणार आहे. यासाठी पालकांची परवानगी आताच घेतली जाणार आहे. तसेच ही परवानगी केव्हाही काढून घेण्याची सोयही यात असणार आहे. परंतू, पालकांनी परवानगी नाकरण्यापूर्वी ज्या संस्थांना माहिती गेली आहे ती कायम राहणार आहे.
फायदा काय...मार्कशीट, प्रमाणपत्र हरवल्यास अनेकदा शाळांचे, बोर्डाचे खेटे घालावे लागतात. ते वाचणार आहेत. नोकरीतील फ्रॉड वाचणार आहे. खोटे प्रमाणपत्र देऊन नोकरी बळकावल्याने अनेक होतकरू उमेदवार नोकरी पासून वंचित राहत होते. ते वाचणार आहे. APAAR ID द्वारे नोकरी देणारी कंपनी उमेदवाराचे एका क्लिकवर कागदपत्र पडताळणी करू शकणार आहेत.