पंढरपूर : भूवैकुंठ म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर हे आध्यात्मिक शहर आहे़ पांडुरंगाचे दर्शन सर्वांसाठी खुले व्हावे यासाठी साने गुरुजींनी तनपुरे महाराजांच्या याच मठात यशस्वी आंदोलन केल़े अनेक चळवळींचे शहर म्हणून पंढरीची ओळख आहे़ त्यामुळे संतांचा अभ्यास करण्यासाठी सोलापूर विद्यापीठाच्या वतीने अध्ययन केंद्र सुरू करावे आणि संत साहित्याची अध्ययन समिती तयार व्हावी, अशी अपेक्षा पहिल्या संत नामदेव साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अशोक कामत यांनी व्यक्त केली.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संत नामदेव साहित्य संमेलनाचा सोमवारी थाटात समारोप झाला, त्या वेळी ते बोलत होते. केवळ कोट्यवधी रुपयांची उधळण म्हणजे संमेलन नसते तर अगदी कमी पैशातही उत्तम ज्ञानसत्र करता येते हेच या श्री नामदेव साहित्य संमेलनाने दाखवून दिले आहे हे खऱ्या अर्थाने साहित्याचे संमेलन ठरले. असेही ते म्हणाले.
पंढरपुरात संत साहित्य अध्ययन समिती सुरू व्हावी
By admin | Published: November 03, 2015 3:00 AM