पुणे : सध्या माणसांमध्ये माणुसकीचा अंश राहिलेला नाही. न्यायव्यवस्थेने केलेले कायदे कितीही चांगले असले, तरी त्याचा उपयोग समाजसुधारणेसाठी होताना दिसत नाही. त्यामुळे समाज कल्याणाकरिता परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करायला हवी, असे मत वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विलास चाफेकर यांनी व्यक्त केले. जाणीव आणि वंचित विकास संथेतर्फे यंदाचा ‘अरुणा-मोहन पुरस्कार’ विलास जावडेकर यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास वंचित विकास संस्थेच्या अध्यक्षा अॅड. आसावरी पानसे, संचालक सुनीता जोगळेकर, मीना कुर्लेकर आदी उपस्थित होते. चाफेकर म्हणाले, ‘‘प्रत्येकाने किमान आपल्या कर्तव्याचे आणि नागरिकत्वाचे पालन केले, तरीही समाजात माणुसकी टिकून राहील. सध्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांची आवश्यकता आहे. धनाचा मोह होऊ न देता, ते समाजाचे आहे, असे म्हणणारे द्रष्टे लोक फार कमी आहेत. कोणतेही चांगले काम करण्यासाठी मनाची तयारी आणि धैर्याची गरज असते. वंचित विकाससारख्या सामाजिक संस्थांना आर्थिक मदतीची गरज असतेच, पण शक्य झाल्यास आपला वेळ देऊन त्यांच्या पाठीशी उभे रहावे.’’मीना कुर्लेकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)स्वत:चे मूल्यमापन करता यायला हवे४पुरस्काराला उत्तर देताना जावडेकर म्हणाले, ‘‘समाजात काम करताना स्वत:चे मूल्यमापन करता आले पाहिजे. एखाद्या व्यक्तिप्रमाणेच प्रसंगाचेही मूल्यमापन करता आले पाहिजे. कोणत्याही दु:खाच्या प्रसंगी आनंदी राहून धैर्याने सामोरे जायला शिका.’’
परिवर्तनाची सुरुवात स्वत:पासून करा
By admin | Published: March 17, 2015 12:31 AM