मुंबई : राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) प्रवेश प्रक्रियेला सोमवारी, २७ जूनपासून सुरुवात होत आहे. एकूण सहा फेऱ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडणार असून, पहिल्या चार फेऱ्या प्रवेशाच्या, तर शेवटच्या दोन फेऱ्या समुपदेशनासाठी असतील.राज्यातील शासकीय आणि खाजगी आयटीआय प्रवेश हे केंद्रीय आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया पद्धतीनेच होणार आहेत. दहावी आणि बारावीनंतर प्रत्येकी एक आणि दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना ३१ आॅगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहेत. त्यानंतर प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. पहिल्या चार फेऱ्यांनंतर जिल्हास्तरीय समुपदेशनाची पाचवी आणि संस्थापातळीवरील समुपदेशनाची सहावी फेरी पार पडेल. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तरी १० जुलैपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. प्रवेशाचे वेळापत्रकआॅनलाइन प्रवेश अर्ज करणे - २७ जून ते १० जुलैप्रवेश अर्ज निश्चिती - २७ जून ते ११ जुलैपहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानिहाय विकल्प व प्राधान्य देणे - २७ जून ते ११ जुलैप्राथमिक गुणवत्ता यादी - १२ जुलै (सकाळी ११ वाजता)पहिली प्रवेश फेरी - १४ जुलै (सकाळी ११ वाजता)दुसरी प्रवेश फेरी - २० जुलै सकाळी ८ ते २२ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंततिसरी प्रवेश फेरी - २९ जुलै सकाळी ८ ते ३१ जुलै सायंकाळी ५ वाजेपर्यंतचौथी प्रवेश फेरी - ६ आॅगस्ट सकाळी ८ ते ८ आॅगस्ट सायं. ५ वाजेपर्यंतपाचवी प्रवेश फेरी (जिल्हास्तरीय समुपदेशन फेरी) - १ आॅगस्ट सकाळी ८ पासून ते १३ आॅगस्ट सायं. ५ पर्यंतसहावी प्रवेश फेरी (संस्थास्तरीय समुपदेशन फेरी) - १ आॅगस्ट सकाळी ८ पासून १७ आॅगस्ट सायं. ५ पर्यंत.
आजपासून आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू
By admin | Published: June 27, 2016 1:47 AM