आप्पासाहेब पाटील, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ११ - लाच घेणा-याच्या विरोधात जनतेत असलेली चीड व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पालटलेले रूप, तक्रारी करण्याची साधी व सोपी परिभाषा यामुळे राज्यात लाचखोर पकडण्याच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत चालली आहे़ राज्यात जानेवारी ते आआॅक्टोबर या ९ महिन्यात तब्बल ७८१ सापळा कारवाया यशस्वी करण्यात एसीबीला यश आले आहे़ याशिवाय अपसंपदाच्या ११ तर अन्य भ्रष्ट्राचाराच्या ११ केसेस एसीबीने विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत़ दरम्यान, राज्यात दिवसाला सरासरीच्या तुलनेत ३ लाचखोर जाळ्यात सापडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे़
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वरिष्ठांनी राज्यातील एबीबीच्या सर्वच अधिकाºयांना नागरिकांकडून आलेल्या प्रत्येक तक्रारीवर निर्णय घेणे सक्तीचे केले. एसीबीच्या कारवाईसाठी जनतेचा प्रतिसाद महत्त्वाचा आहे, हे ओळखून टोल फी क्रमांक, आॅनलाइन तक्रारी घेणे सुरू केले. तसेच प्रत्येक जिल्ह्यातील युनिटला दोन मोबाईल दूरध्वनी क्रमांक, व्हॉटसअप नंबर जनतेच्या संपकार्साठी उपलब्ध करून दिले. त्यामुळे राज्यातील कानोकोपºयातील नागरिकांना लाचखोरांविरूध्द तक्रार करणे सुलभ झाल्याने लाचखोरांच्या तक्रारीत वाढ झाली़ शिवाय एसीबीच्या प्रत्येक अधिकाºयांने त्या तक्रारीवर अॅक्शन घेतल्याने लाचखोर जाळ्यात सापडले़
९ महिन्यात ७८१ लाचखोर सापडले
राज्यात यावर्षभरात आतापर्यंत ७८१ लाचखोर जाळ्यात सापडले आहेत़ यात सर्वाधिक १४९ सापळे हे पुणे विभागात झाले. त्या खालोखाल नाशिक ११५, नागपूर १११, ठाणे औरंगाबाद १०४, नांदेड ८७, अमरावती ८८, ठाणे ९२ आणि मुंबईत ५७ सापळ्यांत लाचखोरांना पकडण्यात आले.
महसुल व पोलीस विभाग टॉपवर
राज्यात एसीबीने जानेवारी ते आॅक्टोबर या महिन्याच्या कालावधीत सापळा, अपसंपदा व अन्य भ्रष्ट्राचाराच्या कारवाईत तब्बल ७८१ पकडले़ यात सर्वाधिक लाचखोर म्हणजेच २२२ हे पोलीस विभाग तर २२० हे महसुल विभागातील आहेत़ कायदा व सुव्यवस्था पाळणाºया पोलीस विभागाने यंदाच्या वर्षी आपला विभाग टॉपवरच ठेवला आहे़ याशिवाय पंचायत समिती ९९, म़रा़वि़मं़ ५६, महानगरपालिका ४९, शिक्षण विभाग ६३ यासह आदी विभागातील लोकसेवकांने लाच घेतली आहे़
१ कोटी ७३ लाखांचा मालमत्ता जप्त
सापळा कारवाई दरम्यान एसीबीच्या पथकाने राज्यातील ९९१ आरोपींकडून १ कोटी ७४ लाख १९ हजार २२३ रूपयांची मालमत्ता हस्तगत केली आहे़ यात सर्वाधिक मालमत्ता ही महानगरपालिका विभागाची आहे़ याशिवाय पोलीस विभभागाची २२ लाख ७० हजार ५४५, महसुल विभागाची १८ लाख ३५ हजार ९२८ एवढी मालमत्ता जप्त केली आहे़ याशिवाय शिक्षण विभाग, समाजकल्याण विभाग, कृषी, क्रिडा, म्हाडा, बेस्ट, सहकार, ग्रामविकास विभागांकडूनही मोठया प्रमाणात मालमत्ता हस्तगत केली आहे़
वर्षनिहाय लाचखोरांची संख्या (अपसंपदा व अन्य भ्रष्ट्राचारासह)
२०१० - ७७३
२०११ - ४३७
२०१२ - ४८९
२०१३ - ५८३
२०१४ - १२४५
२०१५ - १२३४
२०१६ आॅक्टोबर पर्यंत - ७८१
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे येणाºया प्रत्येक तक्रारींची सोडवणुक करण्यासाठी एसीबी विभाग सज्ज आहेच़ पण जर कोणी राज्यात शासकीय/निमशासकीय लोकसेवक शासकीय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रारी करावी़ आम्ही योग्य ती कारवाई करून भ्रष्ट्राचार संपविण्याचा प्रयत्न करू़
-अरूण देवकर, उपअधिक्षक, एसीबी, सोलापूऱ