अकोला : राज्यात २00१ च्या लोकसंख्येच्या आधारावर आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठी राज्य शासनाने बृहत आराखडा तयार केला आहे. त्यानुसार राज्यातील ५६ रुग्णालयांमधील खाटांची संख्या वाढविणे आणि १,२५२ नवीन आरोग्य संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आराखड्यानुसार चार ग्रामीण रुग्णालयांसह १९ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ३0 उपकेंद्रांना मंजुरी देण्याचा निर्णय सोमवारी राज्य शासनाने घेतला. शासनाने दिलेल्या मंजुरीनुसार विदर्भातील अमरावती जिल्ात कांडली, गडचिरोली जिल्ात बुरगी कादोडी, लखमापूर बोरी, कोठी, गोंदिया जिल्ात चिखली, चंद्रपूर जिल्ात बीबी, भंगाराम तळोधी, विरूर स्टेशन आणि यवतमाळ जिल्ात बोधेगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय अहमदनगर जिल्ात सात्रळ, कौठे, कमळेश्वर, पेमगिरी, कोल्हापूर जिल्ह्यात पाचगाव, बीड जिल्ात दिंद्रुड, रत्नागिरी जिल्ात तुरंबव, सांगली जिात देवराष्ट्र, वांगी आणि वाटेगाव येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येणार आहे. लोकसंख्येच्या आधारावर प्राथमिक आयोग्य केंद्रांच्या हद्दीत ३0 नवीन उपकेंद्रे सुरू केली जात आहे. यात १0 विदर्भातील गोंदिया, यवतमाळ जिल्ात सुरू करण्यात येणार आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ात घुग्गुस येथे नवीन ग्रामीण रुग्णालय मंजूर करण्यात आले आहे. नाशिकमध्ये दळवट, पुणेमध्ये उरळीकांचन आणि सांगली जिल्ात हातनूर येथे नवीन ग्रामीण रुग्णालय सुरू होईल. गडचिरोली जिल्ातील धानोरा येथील रुग्णालयातील खाटांची संख्या ३0 वरून ५0 करण्यात आली आहे. ठाणे जिल्ात वसई येथे १00 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. नागपूर जिल्ातील डागा स्मृती स्त्री रुग्णालयातील खाटांची संख्या ३00 वरून ५00 पर्यंत वाढविण्यास मान्यता मिळाली.
राज्यात १९ प्राथमिक आरोग्य केंद्रांसह ३0 उपकेंद्रांना मंजुरी चार नवीन ग्रामीण रुग्णालयांचाही समावेश
By admin | Published: June 12, 2014 12:23 AM