शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

कोकण रेल्वे पुरवणार अत्याधुनिक सुविधा

By admin | Published: November 04, 2015 2:55 AM

मुंबई व मंगळूर या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा कोकण रेल्वे मार्ग आता केवळ कोकणवासीयांपुरताच मर्यादित न राहता लवकरच कोल्हापूर, सातारा या नवीन रेल्वे मार्गाला सुरुवात

नवी मुंबई : मुंबई व मंगळूर या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा कोकण रेल्वे मार्ग आता केवळ कोकणवासीयांपुरताच मर्यादित न राहता लवकरच कोल्हापूर, सातारा या नवीन रेल्वे मार्गाला सुरुवात होणार आहे. यशस्वी वाटचाल करणाऱ्या या कोकण रेल्वेला २०१५-१६ साली ३९ कोटी ३९ लाखांचा निव्वळ नफा मिळाला आहे. तर अपघात टाळण्यासाठी १६हजारांपेक्षा अधिक ठिकाणांचे फेल्युअर काढण्यात आले आहेत. मंगळवारी बेलापूर भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत कोकण रेल्वेच्या वर्षभराच्या यशस्वी वाटचालीबद्दल माहिती देताना अत्याधुनिक तसेच उत्तम दर्जाच्या सेवा पुरवून कोकण रेल्वे मार्गाचा आणखी विकास करणार असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानू तायल यांनी दिली.कोकण रेल्वे प्रशासनाने २०१४-१५ या आर्थिक वर्षात ९७२ कोटी ६१ लाख रु पयांची उलाढाल केली. मागील वर्षी ही उलाढाल ९३२ कोटी ९५लाख इतकी होती. गतवर्षी रेल्वेला मिळणाऱ्या नफ्यामध्ये २४ टक्क्यांनी वाढ झाली होती. तर या वर्षी आतापर्यंत १५ कोटी ८७ लाख रु पयांचा निव्वळ नफा मिळवला असल्याची माहिती कोकण रेल्वेचे अध्यक्ष भानू तायल यांनी दिली. पत्रकार परिषदेला कोकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सिध्देश्वर तेलुगू, संजय गुप्ता (निर्देशक, परिवहन तसेच वाणिज्य), अमिताभ बॅनर्जी (निर्देशक, अर्थ) राजेंद्र कुमार आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)विद्युतीकरणासाठी ७५० कोटी खर्चकोकण रेल्वेच्या विद्युतीकरणासाठी तब्बल ७५० कोटींचा खर्च येणार आहे. कोकण रेल्वेच्या एकेरी मार्ग उभारणीसाठी ३ हजार ५०० कोटींचा खर्च आला होता. आता दुपदरीकरणासाठी १० हजार कोटींचा खर्च येणार आहे.कोकण रेल्वेने रोहा ते पेणपर्यंत दुपदरीकरणाचा प्रस्ताव यापूर्वीच रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता. रोहा ते ठोसूर या ७४१ किमी मार्गाचे दुपदरीकरण होणार आहे. नवीन रेल्वे स्थानके उभारणारतिकिटासाठी विशेष सुविधा, अत्याधुनिक सेवा-सुविधांयुक्त रेल्वे स्थानक, बायो टॉयलेट, आपत्ती व्यवस्थापन केंद्र, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असून दोन वर्षात १०० कोटीपेक्षा जास्त खर्च कोकण रेल्वे करणार आहे. पॅसेंजर रेल्वेच्या संख्येत वाढ केली जाणार असून प्रवाशांची कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची दखल घेतली जाणार आहे. दुपदरीकरणामुळे रेल्वे स्थानकांची संख्या वाढविली जाणार असून १५ ते २० नवीन रेल्वे स्थानके उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. कोकण रेल्वेच्या कामगिरीचा आढावा-३२४० कोचमध्ये १०५०० बायो-टॉयलेट-१०.५मेगा वॉल्ट पवनचक्की कार्यरत असून २५मेगा वॉल्ट पवनचक्की येता नोव्हेंबर महिना अखेरपर्यंत कार्यान्वित करणार-रेल्वेस्थानकावर वाय-फाय सुविधा पुरविणार (अहमदाबाद राजधानी आणि चंदिगड शताब्दी एकूण सहा लोकलला मंजुरी)-भारतभर २४/७ हेल्पलाइन क्रमांक १३८, सुरक्षेसाठी १८२-आॅनलाइन नोंदणी तसेच तिकीट बुकिंग-रद्द झालेल्या ट्रेनची माहिती देण्याकरिता एसएमएस सुविधा-ई-तिकिटाची अत्याधुनिक सेवा हिंदी भाषेतही उपलब्ध, अंधांसाठीही विशेष ई-तिकिटाची सुविधा-शेतकऱ्यांसाठी ‘किसान यात्रा’ विशेष ट्रेन-महिला डब्यात सीसीटीव्ही यंत्रणा