शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
3
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
4
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
5
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
6
Amit Shah : चार नियोजित सभा सोडून अमित शाह तातडीने दिल्लीकडे रवाना; नेमकं कारण काय?
7
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
8
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
9
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
10
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर
11
Indian Players Injured, IND vs AUS 1st Test: टीम इंडिया संकट में है! पहिल्या कसोटीआधी भारतीय संघातील ४ स्टार खेळाडू दुखापतग्रस्त
12
नाशिकमध्ये राज ठाकरेंचा विरोधकांवर घाव, तर अजित पवारांनी ताईंचा वाढवला भाव
13
Bachchu Kadu : "लोकसभेच्या निकालाची पुनरावृत्ती करा"; बच्चू कडू यांचं आवाहन
14
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
15
शादी मुबारक! पापाराझींच्या कमेंटवर तमन्ना भाटियाची अशी रिॲक्शन; विजय वर्माला हसू आवरेना
16
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
17
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
18
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
19
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
20
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा

राज्यात एमएचटी-सीईटी सुरळीत पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2017 3:26 AM

राज्य शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्य शासनाच्या राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत अभियांत्रिकी व औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रवेश परीक्षा (एमएचटी-साीईटी) गुरुवारी सुरळीत पार पडली. या परीक्षेला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी सुमारे ९६ टक्क्यांहून अधिक विद्यार्थ्यांनी हजेरी लावल्याची माहिती सीईटी सेलने दिली आहे.राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर अनुचित प्रकार घडू नये व परीक्षा सुरळीत पार पडावी म्हणून चोख पोलीस बंदोबस्त होता. प्रत्येक परीक्षा केंद्रावर १४४ कलम लागू केल्याने केंद्रांच्या १०० मीटर परिसरातील झेरॉक्स, फोन व इंटरनेट बंद ठेवण्यात आले होते. परीक्षेसाठी एकूण ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील गणित विषयास नोंदणी केलेल्या २ लाख ९३ हजार ९७५ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ८३ हजार ८५४ विद्यार्थी हजर होते. तर भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र विषयांसाठी नोंदणी केलेल्या ३ लाख ८९ हजार ५२० विद्यार्थ्यांपैकी ३ लाख ७६ हजार २८२ विद्यार्थी परीक्षेस उपस्थित होते. जीवशास्त्र विषयाला सर्वाधिक म्हणजेच २ लाख ४४ हजार ७०८ विद्यार्थ्यांपैकी २ लाख ३७ हजार ३४९ म्हणजेच ९६.९९ टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, अशी माहिती सीईटी सेलने दिली.परीक्षेचा निकाल ४ जून २०१७ रोजी लागेल. तंत्रशिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर केला जाईल. उत्तरसूची जाहीर करणे, उमेदवारांना त्यांच्या लॉगइनमधून त्यांच्या स्कॅन उत्तरपत्रिकेची प्रत उपलब्ध करून देणे, उत्तरसूची व प्रश्नांना आक्षेप मागवणे आदींचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केल्याचेही सीईटी सेलने स्पष्ट केले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहनही केले आहे.