शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

विभागातील जलसाठ्याची स्थिती राज्यात उत्तम

By admin | Published: May 06, 2014 8:27 PM

नागपूर : नागपूर विभागातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती राज्यातील इतर विभागाच्या तुलनेत उत्तम आहे. नागपूर विभागातील एकूण ३६६ प्रकल्पांत ५ मे रोजी ४४ टक्के जलसाठा होता. राज्याच्या इतर विभागाच्या तुलनेत हा सर्वाधिक आहे.

उन्हाळ्यात दिलासा : जलाशयात ४४ टक्के साठा

नागपूर : नागपूर विभागातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठ्याची स्थिती राज्यातील इतर विभागाच्या तुलनेत उत्तम आहे. नागपूर विभागातील एकूण ३६६ प्रकल्पांत ५ मे रोजी ४४ टक्के जलसाठा होता. राज्याच्या इतर विभागाच्या तुलनेत हा सर्वाधिक आहे. जलसंपदा विभागाने संपूर्ण राज्यातील मोठे, मध्यम आणि लघु पाटबंधारे प्रकल्पातील जलस्तर जाहीर केला आहे. नागपूर विभागातील प्रकल्पाचा जलस्तर अव्वल आहे. नागपूर विभागात मोठे, मध्यम आणि लघु मिळून एकूण प्रकल्पांची संख्या ही ३६६ आहे. त्यातील प्रकल्पीय क्षमता ३८९१ द.ल.घ.मी इतकी असून ५ मे रोजी धरणात १७२९ द.ल.घ.मी (४४ टक्के) पाणीसाठा होता. मागील आठवड्याच्या तुलनेत तो २ टक्के कमी असला तरी मे २०१३ च्या तुलनेत १० टक्के तर २०१२ च्या तुलनेत २० टक्के अधिक आहे.दुसरा क्रमांक अमरावती विभागाचा आहे. या भागातील ३७९ प्रकल्पांत ३९ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १५ टक्के अधिक), कोकण विभागातील १५८ प्रकल्पांमध्ये ३६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्के कमी), नाशिक विभागातील ३५० प्रकल्पांमध्ये २९ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्के अधिक), मराठवाड्यातील ८०४ प्रकल्पांमध्ये २६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक), पुणे विभागातील ३६८ प्रकल्पांमध्ये २६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्के कमी) पाणीसाठा आहे. राज्यातील एकूण २४२५ प्रकल्पांमध्ये ३१ टक्के पाणी आहे. (गेल्या वर्षीच्या तुलनेत ५ टक्के अधिक आहे.)नागपूर विभागातील १६ मोठ्या प्रकल्पांमध्ये ५१ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १६ टक्के अधिक) पाणी आहे. पेंच प्रकल्पात ५४ टक्के, रामटेक (सूर) प्रकल्पात ६१ टक्के, नांदमध्ये २५ तर वेणामध्ये २७ टक्के पाणी आहे. विभागातील ४० मध्यम प्रकल्पांत २५ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत १० टक्के अधिक) आणि ३१० लघु प्रकल्पांत २६ टक्के (गेल्या वर्षीच्या तुलनेत ११ टक्के अधिक) पाणीसाठा आहे. राज्यातील मोठे, मध्यम प्रकल्पातील पाणीसाठाविभाग पाणीसाठानागपूर ४४ टक्केअमरावती ३९ टक्केकोकण ३६ टक्केनाशिक २९ टक्केमराठवाडा २६ टक्केपुणे २६ टक्के --------------------एकूण (महाराष्ट्र) ३१ टक्के