शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

मराठी वाड्मय निर्मितीसाठी राज्य पुरस्कार जाहीर

By admin | Published: February 06, 2016 5:45 PM

महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट मराठी वाड्मय निर्मितीसाठी सन 2014 च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ६ : महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या उत्कृष्ट मराठी वाड्मय निर्मितीसाठी सन 2014 च्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एक लाख रुपये आणि 50 हजार रुपये असे दोन विभागात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. राज्य शासनातर्फे उत्कृष्ट साहित्य निर्मितीला प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी उत्कृष्ट वाड़मय पुरस्कार दिले जातात.
सन 2014 या वर्षाकरिता उत्कृष्ट मराठी वाड़्मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक/ साहित्यिकांची यादी पुढील प्रमाणे:
 
- प्रौढ वाङमय (काव्य) - कवी केशवसुत पुरस्कार: मनोहर जाधव (तीव्र एकांतातल्या जीर्ण काळोखात), 1 लाख रुपये.
- प्रथम प्रकाशन (काव्य)- बहिणाबाई चौधरी पुरस्कार : विनायक येवले ( ठसे बदललेल्या मुक्कामावरुन), 50 हजार रुपये.
-  प्रौढ वाङमय (नाटक/ एकांकिका)- राम गणेश गडकरी पुरस्कार : प्रा. मधू पाटील (कामस्पर्शिता पाच एकांकिका).
- प्रथम प्रकाशन (नाटक/ एकाकिंका)- विजय तेंडूलकर पुरस्कार : शिफारस नाही; - प्रौढ वाङमय (कांदबरी)- हरी नारायण आपटे पुरस्कार : राजन खान (रजेहो उर्फ मुददाम भरकटलेली कथा),1 लाख रुपये.
- प्रथम प्रकाशन (कादंबरी)- श्री. ना. पेंडसे पुरस्कार : व्यंकट पाटील (घात) , 50 हजार रुपये.
- प्रौढ वाङमय (लघुकथा)- दिवाकर कृष्ण पुरस्कार : विनिता ऐनापूरे (कथा तिच्या), 1 लाख रुपये.
- प्रथम प्रकाशन (लघुकथा)- ग.ल.ठोकळ पुरस्कार : मनस्विनी लता रवीन्द्र (ब्लॉगच्या आरशापल्याड), 50 हजार रुपये.
- प्रौढ वाङमय –(ललितगद्य) (ललित विज्ञानासह) – अनंत काणेकर पुरस्कार : अमृता सुभाष (एक उलट...एक सुलट) 1 लाख रुपये.
-  प्रथम प्रकाशन- (ललितगद्य)- ताराबाई शिंदे पुरस्कार : रवी अभ्यंकर (पन्नाशीचा भोज्या), 50 हजार रुपये.
- प्रौढ वाङमय (विनोद) – श्रीपाद कृष्ण कोल्हाटकर पुरस्कार : मंगला गोडबोले (त्रतू हिरवट), 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय (चरित्र)- न.चिं.केळकर पुरस्कार: प्रा. निलकंठ पोलकर (ज्ञानसूर्य डॉ. डी.वाय. पाटील), 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय (आत्मचित्र)- लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार : म.सु.पाटील (लांबा उगवे आगरी), 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय (समीक्षा/ वाङमयीन संशोधन/ सौंदर्यशास्त्र/ ललितकला आस्वादपर लेखन)- श्री. के. क्षीरसागर पुरस्कार:  यशोदा भागवत (ग्राफिक डिझाईनचे गारुड), 1 लाख रुपये.
- प्रथम प्रकाशन (समीक्षा/ सौंदर्यशास्त्र)- रा.भा. पाटणकर पुरस्कार : शिफारस नाही.
- प्रौढ वाङमय (राज्यशास्त्र / समाजशास्त्र)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार : विजय नाईक (साऊथ ब्लॉक दिल्ली शिष्टाईचे अंतरंग), 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय (इतिहास)- शाहू महाराज पुरस्कार : डॉ. माया पाटील (शहापूरकर) मंदिर-शिल्पे मराठवाडयातील काही शिल्प आणि मंदिर स्थापत्य, 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय (भाषाशास्त्र/ व्याकरण)- नरहर कुरुंदकर पुरस्कार : डॉ. सुधीर रा. देवरे (अहिराणीच्या निमित्ताने : भाषा) ,1 लाख रुपये.
-  प्रौढ वाङमय (विज्ञान व तंत्रज्ञान) (संगणक व इंटरनेटसह)- महात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार : डॉ. निवास पाटील (शोध देवकणाचा), 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय (शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह) –वसंतराव नाईक पुरस्कार: गजेंद्र प्रभाकर बडे (योजनाची विकासगंगा भाग : 1 शेतीच्या येाजना), 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय (दलित साहित्य);- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार : शिफारस नाही, 1 लाख रुपये.
-  प्रौढ वाङमय (अर्थशास्त्र व अर्थशास्त्राविषयक लेखन) –सी.डी. देशमुख पुरस्कार : डॉ. जे.के.पवार (अर्थायन), 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय (तत्वज्ञान व मानसशास्त्रच)- ना. गो. नांदापूरकर पुरस्कार: राजीव साने (गल्लत गफलत गहजब), 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय (शिक्षणशास्त्र)- कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार: मंगला कुलकर्णी (शिक्षणातून स्वयंपूर्णतेकडे), 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय (पर्यावरण)- डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार : संतोष शिंत्रे (विज्ञानाधारित निसर्ग संवर्धन-संरक्षण), 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय  (संपादित/ आधारित)- रा.ना.चव्हाण पुरस्कार: संपा. अरुणा ढेरे (स्त्री-लिखित मराठी कथा 1950 ते 2010); प्रौढ वाङमय (अनुवादित)- तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार: अनु. वर्षा गजेंद्रगडकर (दोन क्षितिजे), 1 लाख रुपये.
- प्रौढ वाङमय (संकीर्ण- क्रीडासह)- भाई माधवराव बागल पुरस्कार : सुकन्या आगाशे (मागोवा मिथकांचा), 1 लाख रुपये.
- बालवाङमय (कविता)- बालकवी पुरस्कार : शं.ल.नाईक (माकडोबाची वरात), 50 हजार रुपये.
- बालवाङमय (नाटक व एकांकिका)- भा.रा. भागवत पुरस्कार : शिफारस नाही, 50 हजार रुपये.
- बालवाङमय (कादंबरी)- साने गुरुजी पुरस्कार : सुरेश वांदिले (बेअर्ड काका), 50 हजार रुपये.
- बालवाङमय (कथा- छोटया गोष्टी, परीकथा, लोककथांसह)- राजा मंगळवेढेकर पुरस्कार : भा.ल.महाबळ (चोरानं खोकला नेला !), 50 हजार रुपये.
- बालवाङमय सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे)- यदुनाथ थत्ते पुरस्कार : मंगला नारळीकर (गणित गप्पा भाग एक), 50 हजार रुपये.
- बालवाङमय (संकीर्ण) – ना.धो. ताम्हणकर पुरस्कार : डॉ. भगवान अंजनीकर.