मुंबई : वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे ‘स्तन-कर्करोग राज्यस्तरीय जागृती मोहीम’ राबविण्यात येणार आहे. मोहिमेदरम्यान शिबिरांतून सुमारे अडीच लाख महिलांची विनामूल्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट आहे. इम्पॅथी फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या साहाय्याने ही मोहीम राबविणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी शनिवारी येथे दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वैद्यकीय शिक्षण विभागातर्फे इम्पॅथी फाउंडेशनच्या सहकार्याने स्तन-कर्करोग मोफत तपासणी मोहिमेचा प्रारंभ महाजन यांच्या हस्ते झाला. तपासणीसाठीचे उपकरण रेडीएशन फ्री असून, कोणत्याही वयोगटातील महिलांसाठी तसेच गर्भवती महिलांच्या तपासणीसाठी ते वापरता येणार आहे. या उपकरणाच्या अनेक चाचण्या झाल्या असून, त्याचा वापर आरोग्यासाठी सुरक्षित आहे. मंत्रालयातील महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी विनामूल्य तीन दिवसीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार असल्याचेही महाजन यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
स्तन-कर्करोगावर राज्यस्तरीय जागृती मोहीम
By admin | Published: September 18, 2016 4:52 AM