शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा अध्यक्ष असताना अमित शाहांना वाट बघायला लावायचे नितीन गडकरी?; स्वत: केला खुलासा
2
...तर आम्ही काम करणार नाही; अजित पवारांच्या आमदाराविरोधात शिवसेना नेत्याने दंड थोपटले
3
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
4
दहावी नापास अय्यूबचा लग्नाच्या नावाखाली ५० महिलांना गंडा; 'असा' अडकवायचा जाळ्यात
5
IND vs BAN : 'आण्णा'ची बॅटिंग बघून गिल 'चौंकना'; दाखवला "दिल है की मानता नहीं" शो!
6
Deepak Tijori : अभिनेता दीपक तिजोरीची १७.४० लाखांची फसवणूक; प्रसिद्ध निर्मात्याने 'असे' हडपले पैसे
7
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
8
फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये कोणत्या बँकांच्या कार्ड्सवर मिळतोय डिस्काउंट? पाहा संपूर्ण लिस्ट...
9
Government Company IPO : 'ही' सरकारी कंपनी शेअर बाजारात लिस्ट होण्याच्या तयारीत, पाहा कधी येणार IPO 
10
इस्त्रायल लेबनानच्या 'पेजर' स्फोटात भारताचं कनेक्शन; केंद्रीय तपास यंत्रणा अलर्ट
11
PPF vs NPS : तुमच्या मुलांसाठी कोणती स्कीम बेस्ट; कशात मिळेल जास्त रिटर्न? जाणून घ्या डिटेल्स
12
"ओए... सोए हुए हैं सब लोग..!" कॅप्टन रोहित झाला 'अँग्री यंग मॅन'; सगळं स्टंप माइकमध्ये झालं रेकॉर्ड (VIDEO)
13
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
14
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
15
VIDEO: PM मोदींच्या वाढदिवसानिमित्त खोटं खोटं रक्तदान; फोटो काढून निघून गेले भाजपचे महापौर
16
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
17
Pitru Paksha 2024: विशेषतः पितृपर्वात त्र्यंबकेश्वर येथे जाऊन का केली जाते कालसर्प शांती? वाचा
18
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
19
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
20
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा

राज्य बँकेला साडेचारशे कोटींचा नफा

By admin | Published: August 24, 2014 1:11 AM

गेल्या पाच वर्षात शेती कर्जपुरवठय़ाबरोबर व्यावसायिक धोरण स्वीकारल्याने बॅँकेला तब्बल 452 कोटी निव्वळ नफा झाला

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : परिणय फुके यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी नागपूर : राज्यातील महावितरणचे वीजदर गेल्या चार- पाच वर्षात सातत्याने वाढत आहेत़ आॅगस्ट २००९ पासून फेब्रुवारी २-१४ पर्यंतच्या ५५ महिन्यात १३ वेळा वीजदर वाढ लादण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील सर्व २ कोटी १५ लाख वीजग्राहकांचे दर सरासरीने दुप्पट वा अधिक झाले आहेत. किमान २४०० कोटी रुपयांहून अधिक दरवाढ लागू करण्यात आलेली आहे. या दरवाढीवर नियंत्रण ठेवून सर्वसामान्य वीज ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी नगरसेवक डॉ. परिणय फुके यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.नगरसेवक फुके यांच्या नेतृत्त्वात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा यांना संबंधित मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, अतिरीक्त वीज आकार संपल्यानंतर आजही राज्यातील औद्योगिक वीजदर शेजारील तसेच देषातील सर्व राज्यांच्या तुलनेत सव्वापट वा अधिक आहेत. यंत्रमागाचे वीजदर केवळ गुजरात वगळता देशात सर्वाधिक आहेत़ शेतीच्या वीजदराचे बाबतीत महाराष्ट्र सर्वाधिक दर असणाऱ्या पहील्या पाच राज्यांमध्ये आहे़ राज्याचा सर्वागीण विकास, राज्याचा महसूल, राज्यातील रोजगार निर्मिती या सर्व दृष्टीने विचार करता उद्योग, शेती व यंत्रमाग या तिन्ही घटाकंचे वीजदर शेजारील व देशातील अन्य राज्यांच्या तुलनेने समपातळीवर व स्पर्धात्मक पातळीवर असणे अत्यंत आवश्यक आहे़ अन्यथा याचे कायमस्वरूपी घातक परिणाम राज्याच्या विकासावर होऊ शकतात. २०१२-१३ मध्ये मध्ये औद्योगिक वीजवापर कमी झाल्याचे महावितरणनेच जाहीर केले आहे़ उद्योग बाहेर जाऊ लागले आहेत़ शेतकरी व यंत्रमागधारकांमध्ये प्रचंड मोठया प्रमाणात आर्थिक कोंडी व असंतोष निर्माण झालेला आहे़ राज्यातील सरकार, वीज आयोग व शासनाच्या मालकीच्या कंपन्या या वीज कायद्याचे उद्दिष्ट व त्यामधील तरतुदी याआधारे प्रामाणिकपणे काम केले, तसेच अकार्यक्षमता, गळती व भ्रष्टाचार या विरोधात कठोरपणे पावले उचलली तर महाराष्ट्रातील वीजवर कोणत्याही अनदानाशिवाय इतर राज्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक व समपातळीवर येतील़ असे झाले तरच ते राज्य सरकार, वीजग्राहक व कंपन्या या सर्वांच्या हिताचे व विकासाचे ठरेल़ अन्यथा सबसिडी बंद झाल्यांनतरचे प्रश्न सर्वच घटकांसाठी आणखी भयावह होतील़ या सर्व बाबींची गांभीर्याने नोंद घेऊन राज्य सरकार, आयोग व शासकीय कंपन्या या तिन्ही घटकांनी कायद्यानुसार, राज्याच्या विकासाच्या व हिताच्या दृष्टीने कठोर निर्णय घ्यावेत व पारदर्षक कारभार करावा़ पर्यायाने ग्राहकांच्या व राज्याच्या हिताचे सरंक्षण करावे, अशी मागणीही फुके यांनी केली आहे. (प्रतिनिधी)