मुंबई : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ९ मार्चपासून मुंबईत सुरू होत असून, १८ मार्चला वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार हे अर्थसंकल्प सादर करतील.विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील तात्पुरते कामकाज ठरविण्यासाठी, आज विधानसभा व विधान परिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनात झाली. या वेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती वसंत डावखरे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आदी उपस्थित होते. सांसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले की, ‘९ मार्च रोजी राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरुवात होणार असून अधिवेशनाचे कामकाज १७ एप्रिलपर्यत चालेल. याशिवाय अधिवेशनात शासकीय व अशासकीय कामकाजाबरोबरच प्रस्तावित सहा विधेयके व तीन अध्यादेशांवर चर्चा होणार आहे. याशिवाय विविध समित्यांचे अहवाल अधिवेशनादरम्यान मांडण्यात येतील. (विशेष प्रतिनिधी)
राज्य अर्थसंकल्प १८ मार्चला सादर होणार
By admin | Published: February 24, 2016 2:02 AM