शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

राज्य सहकारी बँकेला ६०९ कोटींचा निव्वळ नफा; कर्ज वितरणात ४९० कोटी रुपयांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 8:01 AM

बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सरत्या आर्थिक वर्षामध्ये अनेक पातळ्यांवर बँकेची कामगिरी उत्तम राहिली आहे.

मुंबई - नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये दि महाराष्ट्र स्टेट-को-ऑपरेटिव्ह बँकेने ६०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे. विशेष म्हणजे, गेल्या आर्थिक वर्षामध्ये बँकेला ६०३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. मात्र, त्यात राज्य शासनाकडून थकहमीपोटी मिळालेल्या रकमेचा समावेश होता. मात्र, यंदा बँकेला मिळालेला नफा हा निव्वळ नफा असून यामध्ये राज्य शासनाकडून थकहमीपोटी मिळालेल्या रकमेचा समावेश नाही. 

बँकेने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सरत्या आर्थिक वर्षामध्ये अनेक पातळ्यांवर बँकेची कामगिरी उत्तम राहिली आहे. यामध्ये बँकेचे नक्त मूल्य ३८१७ कोटी रुपये झाले असून गतवर्षीच्या तुलनेत यामध्ये तब्बल ५९० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. देशातील सर्व सहकारी बँकांच्या तुलनेत राज्य बँकेचे नक्त मूल्य आजच्या घडीला जास्त आहे. रिझर्व्ह बँकेच्या निकषानुसार बँकांना भांडवल पर्याप्तता प्रमाण अर्थात सी.आर.ए.आर. हे ९ टक्के राखणे आवश्यक आहे. राज्य बँकेने हे प्रमाण १७.७६ राखल्यामुळे बँकेच्या नफ्यात वाढ झाली आहे.

३१ मार्च २०२३ पर्यंत बँकेने एकूण २६ हजार ४५० कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले असून त्या आधीच्या वर्षाच्या कर्ज वितरणाच्या तुलनेत यंदाचा कर्ज वितरणाचा आकडा हा ४९० कोटी रुपयांनी अधिक आहे तसेच, बँकेने आपला प्रोव्हिजनिंग कव्हरेज रेशो ९७ टक्के इतका ठेवल्याने अनुत्पादित कर्जाचे निव्वळ प्रमाण ०.४५ टक्के इतके कमी झाल्याचे बँकेने कळवले आहे. - विद्याधर अनास्कर, प्रशासक, दि महाराष्ट्र स्टेट-को-ऑपरेटिव्ह बँक

टॅग्स :bankबँक