शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
5
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
6
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
8
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
9
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
10
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
11
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
12
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
13
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
14
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
15
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
16
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
17
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2020 7:42 PM

सत्तार यांच्याप्रमाणे अनेकजण अस्वस्थ आहेत...

ठळक मुद्देबारामती आणि इंदापुर दौऱ्यांनंतर पत्रकारांशी प्रदेशाध्यक्ष पाटील चंद्रकांत पाटील यांचा संवाद लोकांची सेवा लांब, मलईदार खात्यांसाठी रस्सीखेच सुरु सत्तार यांच्या राजीनाम्याच्या भुमिकेमुळे अनेकांना धीर

बारामती : गेले दोन महिने राज्यातील सर्वसामान्य माणूस देवाच्या भरवशावर जगत आहे. इथे सरकार नावाची कोणती गोष्टच नाही. राज्यातील शेतकरी वाऱ्यावर आहे, ही बाब दुर्देवी आहे. देवाच्या भरवशावर हे सरकार चालले आहे. मंत्र्यांची खातीच न ठरल्याने एखाद्या विभागाकडे सर्वसामान्यांचे काम असल्यास परमेश्वराकडुनच करुन घ्यावे लागणार आहे, असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला.

बारामती आणि इंदापुर दौऱ्यांनंतर बारामती येथे पत्रकारांशी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला.  त्यावेळी ते बोलत होते. पाटील म्हणाले,राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष भाजपबद्दलचा राग व्देष आणि तिरस्कार यातुन एक होत आहेत. अनेक ठिकाणी आम्हाला हरविण्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागत आहे, याचा आम्हाला आनंद आहे.त्यांनी हिंमत असेल तर सुटे सुटे लढावे,असे आव्हान त्यांनी  विरोधकांना दिले. महाराष्ट्रात बट्याबोळ सुरु आहे. प्रचंड भांडणे सुरु आहेत. लोकांची सेवा लांब, मलईदार खात्यांसाठी खेचाखेची सुरु आहे. आज मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिलेला राजीनामा ही सुरवात आहे.सत्तार यांच्याप्रमाणे अनेकजण अस्वस्थ आहेत.सत्तार यांच्या राजीनाम्याच्या भुमिकेमुळे अनेकांना धीर आला.तिन्ही पक्षात' ग्रुप फॉर्मेशन' होईल. मुुख्यमंत्र्यांकडे कोणतेच खाते नाही, अशी राज्यात स्थिती आहे. उध्दव ठाकरे यांची कर्जमाफी फसलेली असुन शेतकऱ्यांची सर्वात वाईट अवस्था झाली आहे. केवळ सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले आहेत. निवडुन आल्यानंतर ते एकत्र आले आहेत.भविष्यात जेव्हा ते एकत्रित  निवडणुकांना सामोरे जातील तेव्हा मतदार कोणाला बहुमत देतो हे दिसेलच. निवडणुक पुर्व आघाडी करुन सेना काँग्रेस व राष्ट्रवादी लढल्यास भाजपचा विजय निश्चित होईल,असे पाटील म्हणाले. भविष्यात शिवसेना व भाजप एकत्र येण्याची शक्यता कितपत आहे.या प्रश्नावर पाटील म्हणाले,राजकारणातच नाहि तर माणसाच्या जीवनात कधी काय होईल याची गॅरंटी नसते. आम्ही एकत्र येण्याचा प्रयत्न करीत नाहि. पण भविष्यात या सरकारमध्ये शिवसेनेला असह्य झाल्यास भाजप हाच त्यांना एकमेव पर्याय असेल, अशा शब्दात पाटील यांनी शिवसेनेला अजुन हि भाजपचे दरवाजे खुले असल्याचे संकेत दिले. एवढ्या मोठ्या शिवसेनेला  कार्यकर्त्यांना द्यायला मंत्रीपदे दहा व राष्ट्रवादीला सोळा मंत्रीपदे मिळाली आहेत. राज्याचे ७५ टकके बजेट वापरले जाणारी सर्व खाती राष्ट्रवादी काँग्रेसकडे  आहेत. तकलादु खाती सेनेसह काँग्रेसकडे दिली आहेत.हे सरकार फार काळ चालणार नाहि.सावरकरांबाबत आक्षेपार्ह  लिखाणाच्या मुद्दयावरुन सावरकरांच्या कुटुंबियांनी काल दिवसभर मुख्यमंत्र्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण मुख्यमंत्री त्यांना दिवसभर उपलब्ध झालेच नाहि. कारण मुख्यमंत्र्यांकडे सांगण्यासारखे काही राहिलेलेच नाहि.सत्तेसाठी शिवसेनेने तत्वांना तिलांजली दिल्याची टीका पाटील यांनी केली.——————————————....कारखान्यावर देखील पुन्हा महाविकास आघाडी भाजप सर्वच निवडणुका ताकदीने लढते. माळेगांव कारखान्यामध्ये आमची सत्ता आहे.छत्रपती मध्ये काही मतांचा फरक आहे.सोमेश्वरला मात्र, जास्त मतांचा फरक होता. या सर्व कारखान्याच्या निवडणुकीत भाजप पुर्ण ताकतीने उतरणार आहे.कारखान्यावर देखील पुन्हा महाविकास आघाडी होणार. हि महाविकासआघाडी भाजपला पराभुत करण्याचा प्रयत्न करणार. एखाद्या वेळी महाविकासआघाडी यशस्वी होवु शकते. कारण ती बांधील असते. भाजपला मात्र, आगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीत मतदार महाविकासआघाडी कि भाजपला मतदान करतात,हे पहायचे असल्याचे पाटील म्हणाले. ——————————————..........

टॅग्स :Baramatiबारामतीchandrakant patilचंद्रकांत पाटीलcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेना