शहरं
Join us  
Trending Stories
1
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
2
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
3
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
5
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
6
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
7
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
8
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
9
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
10
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
11
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
13
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
14
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
16
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
18
'सत्य बाहेर येत आहे...', PM नरेंद्र मोदींनी केले 'द साबरमती रिपोर्ट' चित्रपटाचे कौतुक
19
भारताला दिलासा! शुबमन गिलच्या अंगठ्याला दुखापत, त्याच्या जागी संघात येणार अनुभवी खेळाडू
20
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल

राज्य उत्पादन शुल्काच्या महसुलात २० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 6:45 AM

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या ५ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्याच्या एकूण महसुलामध्ये वाढ झालेली असताना नागपूर विभागात मात्र तब्बल २९ टक्क्यांची घट झाली आहे.

- खलील गिरकरमुंबई  - राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसुलात १ एप्रिल ते ३१ आॅगस्ट या ५ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २० टक्क्यांची वाढ झाली आहे. राज्याच्या एकूण महसुलामध्ये वाढ झालेली असताना नागपूर विभागात मात्र तब्बल २९ टक्क्यांची घट झाली आहे. तसेच, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही घट झाली आहे. मुंबई शहरात १०.७२ टक्क्यांची तर, उपनगरात २९.२६ टक्क्यांची घट झाली आहे.२०१८-१९ या वर्षासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने १५ हजार ३४३ कोटी रुपयांच्या महसुलाचे उद्दिष्ट समोर ठेवले असून या कालावधीत ५ हजार ५०१ कोटी रुपयांचा महसूल मिळवण्यात विभागाला यश आले आहे. गतवर्षी या कालावधीत ४ हजार ५९९ कोटी रुपयांचा महसूल जमा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता झालेली ही वाढ १९.६१ टक्के इतकी आहे. नियोजित उद्दिष्टाच्या एकूण ३५.८६ टक्के महसूल जमा करण्यात विभागाला यश आले आहे.कोल्हापूर विभागाचे उद्दिष्ट १,२९० कोटी रुपये एवढे असताना आतापर्यंत या विभागाकडून ४५७ कोटी रुपयांचा महसूल जमा करण्यात आला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ २२.४४ % आहे.औरंगाबाद विभागाचे उद्दिष्ट ४,८२४ कोटी असून आतापर्यंत १८९२ कोटींचा महसूल जमा झाला आहे. ही वाढ १८.५२ % इतकी आहे. ठाणे विभागाचे उद्दिष्ट २,६९९ कोटी असून आतापर्यंत ८१६ कोटी महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही १६.६० % वाढ आहे. तर नागपूर विभागाचे उद्दिष्ट ८८२ कोटी असून आतापर्यंत केवळ १८६ कोटी महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत त्यामध्ये २९.५८ टक्क्यांची घट झाली आहे.राज्यात नाशिकमध्ये सर्वांत जास्त महसूलमहसूल प्राप्तीत राज्यात सर्वांत जास्त महसूल वाढ नाशिकमध्ये झाली आहे. नाशिक विभागाला २२०८ कोटींचे उद्दिष्ट असताना आतापर्यंत ९६७ कोटींचा महसूल जमा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ ४९.८१ %आहे.सर्वाधिक वाढ झालेले जिल्हे : भंडारा-२९७ %, उस्मानाबाद-१३८.२९ %, वाशिम-१३० %, धुळे-१२८ %, हिंगोली-१००.८९ %,घट झालेले जिल्हे : बुलडाणा- ८६.९६ %, सांगली-४३.५९ %, परभणी-४२.४२ %, नागपूर-३४.८८ %, ठाणे-३४.२३ %, मुंबई उपनगर-२९.२६ %

टॅग्स :Taxकरnewsबातम्या