कुर्डूवाडी : २ आॅक्टोबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियान व स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत कुर्डूवाडी शहरात राबविलेली शहर स्वच्छता मोहीम, घनकचरा संकलन, वाहतूक प्रक्रिया तसेच शौचालय व्यवस्थापन अंतर्गत सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, वैयक्तिक शौचालयांची पाहणी करून राज्य शासनाच्या कमिटीने समाधान व्यक्त केले व आवश्यक त्या सूचना केल्या.सुमारे २ दिवस या पथकाने शहरात फिरुन पाहणी केली. दि. २० रोजी रात्री ९ वाजेपर्यंत तर दि. २१ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून ते दुपारी विश्रांतीनंतर सायं़ ६ वाजेपर्यंत पाहणी केली. या पथकात प्रधान सचिव नगरपरिषद प्रशासन संचालनालय मुंबई या कार्यालयाकडून प्रादेशिक सहसंचालक पुणे विभाग पुणे राजेंद्र चव्हाण, नगरपरिषद सांगोल्याचे मुख्याधिकारी रमाकांत डाके, स्त्रीमुक्ती संघटना मुंबईच्या समन्वयिका कल्पना अंधारे आदी समितीत होते. या पथकाने शहरातील गोल काडादी चाळ, सातव कॉलनी, अण्णाभाऊ साठेनगर, माढा रोड, सिध्देश्वरनगर, जिजामातानगर, आंतरभारती विद्यालय परिसर, भाजी मंडई, एसटी स्टँड, टेंभुर्णी रोड आदी ठिकाणी स्वच्छतेची पाहणी केली. शहरातील नागरिकांना स्वच्छतेबाबत प्रश्न विचारुन आरोग्याविषयीची माहिती घेतली.यावेळी नगराध्यक्षा जयश्री गोरे, उपाध्यक्ष संजय टोणपे यांच्यासह नगरपालिकेचे सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी डॉ.पंकज जावळे, कार्यालय निरीक्षक डी.डी.देशमुख, स्वच्छता निरीक्षक तुकाराम पायगण, विद्युत अभियंता अविनाश शिंदे, पाणी पुरवठा विभागाचे अतुल शिंदे, प्रवीण देवडकर, रवींद्र भांबुरे, गणेश ढवळे, जयसिंग लोखंडे, नितीन आखाडे, नंदकुमार कदम, स्रेहल साळवे, राजू कदम, राम ताकभाते, ब्रिजपाल वाल्मिकी, राजेंद्र चोपडे यांच्यासह नगरपालिका कर्मचारी व आरोग्य विभागाचे कर्मचारी सहभागी होते. (प्रतिनिधी)
राज्य शासनाची कमिटी कुर्डूवाडीत
By admin | Published: April 23, 2016 4:58 AM