शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

कर्जमाफीसाठी नव्या गाईडलाईनच्या विचारात राज्य सरकार

By admin | Published: July 13, 2017 1:29 PM

शेतकऱ्यांच्या कर्जमाफी निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवी मार्गदर्शकतत्त्वं तयार करण्याच्या विचारात आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 13-  शेतकऱ्यांच्या कर्जमाफी निर्णयाची योग्य प्रकारे अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी नवी मार्गदर्शकतत्त्वं तयार करण्याच्या विचारात आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेला अधिकृत सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून महिन्यात ३४ हजार २२ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक कर्जमाफीची घोषणा केली होती, या कर्जमाफीमुळे ४४ लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यानंतर कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी पात्रता निकष सादर केले होते. 
 
2008 मध्ये आघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीत मोठा घोटाळा झाला होता, असा आरोप याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. 
 
दरम्यान, शेतकरी कर्जमाफीचा फायदा लाभार्थी शेतकऱ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहचविण्यासाठी राज्य सरकार नवी मार्गदर्शकतत्त्वं
तयार करण्याच्या विचारात आहे, असं राज्य सरकारमधील वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितलं आहे. या नव्या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये कर्जमाफीचा लाभार्थी, त्याच्या थकीत कर्जाची मोजणी, तसंच कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी विविध बँकाना एकाच प्लॅटफॉर्मवर कसं आणायचं, या सगळ्या बाबींचा समावेश असेल, असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. यापूर्वी कर्जमाफीची योजना नऊ वर्षांपूर्वी तयार करण्यात आली होती. त्यामध्ये काही त्रूटी असून कॅगनेही त्याबद्दल गंभीर अहवाल दिला होता.  
आणखी वाचा
 

आयटीत नोकरीची हमी नसल्याने पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअरची आत्महत्या

सलमानला सायकलिंगचे स्टंट शिकवणा-या अजय पडवळचा मृत्यू

पुणे - डेक्कन क्वीन अडवणा-या महिला प्रवाशी "राष्ट्रद्रोही", रेल्वेचा अजब कारभार

नव्या तत्त्वांमध्ये शेतकऱ्याची व्याख्या, कर्जमाफीच्या योजनेत कोणत्या प्रकारचं कर्ज सामाविष्ट असेल तसंच विभक्त कुटुंबासाठी काय नियम असतील. या संदर्भातील माहिती नव्या मार्गदर्शकतत्त्वांमध्ये असणार आहे. 

2008 मध्ये आघाडी सरकारने कर्जमाफी केली होती पण लाभार्थी शेतकरी नेमके कोणते याबद्दलची स्पष्टता देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कर्जमाफीसाठी पात्र नसलेल्या शेतकऱ्यांचंही कर्ज माफ झालं होतं. म्हणूनच त्याची पुनरावृत्ती टाळण्यासाठी राज्य सरकारने आवश्यक ती शेतकऱ्यांसंदर्भातील माहिती पुरवावी अशी मागणी बँकांनी केली. या माहितीनुसार पात्र आणि अपात्र शेतकरी ठरवणं बँकांना सोप जाणार आहे, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. 
आधी छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून 1 एप्रिल 2012 ते 30 जून 2016 या काळात शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज माफ करण्याचा निर्णय झाला होता. पण त्यानंतर तारीख वाढवून जून 2017 पर्यंत कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला.