सातारा : ‘मुंबई महानगरपालिकेची सत्ता ताब्यात आल्याखेरीज राज्यावर पकड मिळणार नाही, ही भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाकांक्षा आहे. त्यामुळे या निवडणुकीआधी सरकार अल्पमतात जाईल,’ असे भाकीत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी सातारा येथे पत्रकार परिषदेत केले. आ. चव्हाण म्हणाले, ‘निवडणूक काळात अव्वा-सव्वा आश्वासने देऊन सत्तेवर आलेले भाजपा, शिवसेना व मित्र पक्षांचे सरकार अत्यंत तकलादू स्वरूपाचे आहे. मुख्यमंत्रीच अधिकारी व सहकारी मंत्री ऐकत नसल्याचे कबूल करताहेत. वेळोवेळी तोंडघशी पडण्याची वेळ त्यांच्यावर येत असते. त्यातच भाजपाची वरिष्ठ नेतेमंडळी मुंबई महानगरपालिकेची सत्ता मिळविण्याची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. यामुळे शिवसेना-भाजपा या दोन पक्षांमध्ये अल्पावधीत तेढ निर्माण होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, मुंबई महानगरपालिका निवडणुकीआधी हे सरकार अल्पमतात जाईल.’ (प्रतिनिधी)
‘मुंबई निवडणुकीआधी राज्य सरकार अल्पमतात’
By admin | Published: February 21, 2016 1:18 AM