मुंबई : शिवसेना, भाजपातील तणाव दिवसेंदिवस वाढत असून, शिवसेना केंद्र आणि राज्य सरकारमधूनही बाहेर पडण्याचे संकेत मिळत आहेत. ‘राज्यातील सरकार सध्या नोटीस पीरियडवर असून, निवडणुकांसाठी जसा आचारसंहितेचा काळ असतो तसाच यासाठीही काही कालावधी आहे. योग्य वेळी मी ते जाहीर करेन,’ असे सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी केल्याने राजकीय तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी मंगळवारी दुपारी मातोश्री निवासस्थानी जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पालिका निवडणुकीत शिवसेनेने ११ गुजराती उमेदवारांना संधी दिली असून, त्यात हार्दिक पटेल यांच्या एका मित्राचा समावेश आहे. मित्राला भेटायला आलेल्या हार्दिक पटेल यांनी उद्धव यांचीही भेट घेतली. या वेळी दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. आधी मला तर निपटा; मुख्यमंत्र्यांचे आव्हानमुंबईत नरेंद्र मोदींची सभा झाली तरी विजय शिवसेनेचा असेल, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर, ‘पंतप्रधान दूरची गोष्ट आहे, आधी देवेंद्रला निपटवून दाखवा,’ असे आव्हान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज दिले. गुजरातमधील आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल यांनी आज उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर भेट घेतली. याबाबत प्रतिक्रिया विचारली असता मुख्यमंत्री पत्रपरिषदेत म्हणाले, पायाखालची वाळू सरकायला लागली म्हणजे अशी बाहेरची माणसे बोलवावी लागतात हे बघून मला ‘हार्दिक’ आनंद झाला. या भेटीमुळे भाजपाच्या गुजराती मतांवर कुठलाही परिणाम होणार नाही. सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री एवढेच म्हणाले की, ‘आपल्या सरकारला पाच वर्षे कोणताही धोका नाही.’
राज्य सरकार नोटीस पीरियडवर
By admin | Published: February 08, 2017 5:38 AM