शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

Maharashtra Unlock News: अनलॉकचा गोंधळ! आधी मंत्र्यांची एक घोषणा; नंतर सरकारची दुसरीच भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2021 9:27 AM

वडेट्टीवार यांच्या घोषणेला छेद देणारे निवेदन आधी मुख्यमंत्री कार्यालयाने आणि नंतर माहिती व जनसंपर्क विभागाने काढले. 

मुंबई : राज्यातील १८ जिल्हे पूर्णत: अनलॉक करण्यात आले असून तेथील सगळे व्यवहार शुक्रवारपासून सुरू होतील, पाच स्तरांवर अनलॉकची प्रक्रिया केली जाईल, अशी घोषणा मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरुवारी दुपारी केली. मात्र, तसा कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने काही तासातच स्पष्ट केल्याने या विषयावरील सरकारी गोंधळ समोर आला.

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी दुपारी झाली.  त्यानंतर बैठकीतील निर्णयांची माहिती वडेट्टीवार यांनी पत्र परिषद घेऊन दिली. कोणत्या जिल्ह्यात काय अनलॉक होणार, हेही त्यांनी सांगितले. मात्र, वडेट्टीवार यांच्या घोषणेला छेद देणारे निवेदन आधी मुख्यमंत्री कार्यालयाने आणि नंतर माहिती व जनसंपर्क विभागाने काढले. 

यानिमित्ताने लॉकडाऊनसंदर्भात सरकारमध्ये  समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्ट झाले. या प्रस्तावाला तत्त्वत: मान्यता दिली असून मुख्यमंत्री त्याबाबत अंतिम निर्णय घेतील, असे वडेट्टीवार यांनी सांगितल्याने लगेच माध्यमांमधून १८ जिल्हे शुक्रवारपासून अनलॉक करण्यात आले असल्याची बातमी झळकली. सरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले की, ब्रेक द चेनमध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे. यापुढे जाताना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेड्‌सची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात  या निकषांच्याआधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सूचना नंतर काढण्यात येतील.अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून  पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे, असेही सरकारच्यावतीने सांगण्यात आले.

१८ जिल्ह्यांत पूर्णपणे लॉकडाऊन उघडण्यात येणारअसा आहे अनलॉकचा प्रस्ताव...औरंगाबाद, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ. या १८ जिल्ह्यांत पूर्णपणे लॉकडाऊन उघडण्यात येणार असून सर्व व्यवहार पूर्वीप्रमाणे सुरळीत सुरू होतील. मात्र् याबाबतची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे.

 या जिल्ह्यांत ५० टक्के क्षमतेने व्यवहार...अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांत खालीलप्रमाणे व्यवहार सुरू होण्याची शक्यता आहे. मॉल्स, थिएटर, रेस्टॉरंट, जिम, सलून, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर ५० टक्के क्षमतेने सुरू होणारलोकल सेवा बंद राहणारसार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला पूर्ण क्षमतेने परवानगी असेलबसेस १०० टक्के क्षमतेने, उभ्याने प्रवास करण्यास मनाईखासगी आणि सरकारी कार्यालये १००% उपस्थितीत सुरू राहतीलइंडोअर आणि आऊटडोअर खेळ सकाळी ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ या वेळेत परवानगीचित्रपट, सिरिअलच्या चित्रिकरणाला परवानगीसांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने करता येणारलग्नसोहळे हॉल मर्यादेच्या ५० टक्के उपस्थितीत किंवा जास्तीत जास्त १०० जणांना परवानगीअंत्यसंस्कारासाठी कोणतेही बंधन नसेलराजकीय बैठका, स्थानिक निवडणुका ५० टक्के क्षमताबांधकाम साईट पूर्ण क्षमतेने सुरू राहतील कृषिविषयक दुकाने पूर्ण सुरू ई कॉमर्स पूर्ण क्षमतेने सुरू राहील

तिसऱ्या स्तरातील १० जिल्ह्यांत अंशत: अनलॉकअकोला, बीड, कोल्हापूर, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांत अंशत: निर्बंध शिथिल होण्याची शक्यता आहे. अत्यावश्यक सेवेतील दुकाने संपूर्ण आठवडा सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू राहतीलअत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सुरू. राहतीलमॉल्स, थिएटर बंदच राहतीलरेस्टॉरंट ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरू राहतील. २ वाजतानंतर होम डिलिव्हरी सुरू राहील.लोकल सेवा बंदच राहील.सार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग सकाळी ५ ते ९ या वेळेत परवानगी असेलखासगी, शासकीय कार्यालये ५० टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगीइंडोअर आणि आऊटडोअर खेळ सकाळी ५ ते ९ या वेळेत सोमवार ते शुक्रवार परवानगीचित्रपट, सिरिअल चित्रिकरण स्टुडिओत करण्यास परवानगी, मात्र गर्दी जमेल अशा चित्रिकरणाला परवानगी नाहीसांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सोमवार ते शुक्रवार परवानगी असेललग्नसोहळे यांना ५० लोक उपस्थित राहण्यास परवानगीअंत्यसंस्कारासाठी २० लोक उपस्थित राहण्यास परवानगीराजकीय बैठका, स्थानिक निवडणुका ५० टक्के क्षमताबांधकाम ऑन साईट, म्हणजे कर्मचारी तिथेच राहत असतील तर परवानगीई कॉमर्स सकाळी ७ ते २ पर्यंत परवानगी

वडेट्टीवारांचा ‘यू-टर्न!’ : अनलॉकसंदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाकडून स्पष्टीकरण आल्यानंतर  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यू-टर्न घेत, अनलॉकला तत्त्वत: मान्यता मिळाल्याचे सांगितले. तसेच याबाबतचा निर्णय स्वत: मुख्यमंत्री शुक्रवारी जाहीर करतील, असे सांगितले.

आज होऊ शकते घोषणाअनलॉकसंदर्भात नव्या नियमावलीची घोषणा स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शुक्रवारी  करण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पुणे आणि रायगड जिल्ह्यांसाठी नियमावलीअत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत  सोमवार ते शुक्रवार सुरू राहतीलअत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता इतर दुकाने बंद राहतीलमॉल्स, थिएटर बंदच राहतीलरेस्टॉरंट केवळ होम डिलिव्हरीसाठी सुरू राहतीलसलून, जिम ५० टक्के क्षमतेने वातानुकूलित यंत्राचा वापर न करतालोकल सेवा बंदच राहीलसार्वजनिक मैदाने, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंग सकाळी ५ ते ९ या वेळेत सोमवार ते शुक्रवार परवानगी असेलखासगी, शासकीय कार्यालये २५ टक्के उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगीइंडोअर खेळास बंदी असेल, तर आऊटडोअर खेळ सकाळी ५ ते ९ या वेळेत सोमवार ते शुक्रवार परवानगीसांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांना परवानगी नाहीलग्नसोहळे यांना २५ लोक उपस्थित राहण्यास परवानगीअंत्यसंस्कारासाठी २० लोक उपस्थित राहण्यास परवानगीस्थानिक निवडणुका ५० टक्के क्षमताकृषिविषयक दुकाने सकाळी ७ ते  दुपारी २ या वेळेत सोमवार ते शुक्रवार सुरू राहतीलबांधकाम ऑन साईट, म्हणजे कर्मचारी तिथेच राहत असतील तर परवानगीई कॉमर्स केवळ अत्यावश्यक सेवेतील वस्तूंसाठी सुरू राहीलसार्वजनिक बसेस ५० टक्के आसन क्षमतेने सुरू राहतील

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसUddhav Thackerayउद्धव ठाकरेVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार