मुंबई : राज्य शासनाने गुरुवारी २०१५च्या बॅचमधील सात आयएएस अधिका-यांच्या बदल्या केल्या आहेत.त्यानुसार, अमन मित्तल यांची बदली सहाय्यक जिल्हाधिकारी; कळवण, जि.नाशिक आणि एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कळवण येथे करण्यात आली आहे. आयुष प्रसाद हे पुणे जिल्ह्यातील खेड उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी व घोडेगाव आदिवासी एकात्मिक विकास प्रकल्पाचे अधिकारी असतील. सचिन ओंबासे यांची नियुक्ती गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे सहाय्यक जिल्हाधिकारी व आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी म्हणून करण्यात आली आहे.अन्य बदल्या अशाविनय गौडा - सहाय्यक जिल्हाधिकारी व प्रकल्प अधिकारी तळोदा, जि.नंदुरबार. भुवनेश्वरी एस. - सहाय्यक जिल्हाधिकारी व आदिवासी प्रकल्प अधिकारी पांढरकवडा, जि. यवतमाळ. अजित कुंभार - सहाय्यक जिल्हाधिकारी व आदिवासी प्रकल्प अधिकारी किनवट, जि.नांदेड. राहुल कर्डिले - सहाय्यक जिल्हाधिकारी; सेलू, जि.परभणी.
राज्य शासनाकडून २०१५च्या बॅचमधील सात आयएएस अधिका-यांच्या बदल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2017 1:41 AM