छत्रपती संभाजीनगर : शिंदे-फडणवीस सरकारने अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरण (एनडीआरएफ)च्या निकषाच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय घेतला होता. शासनाने हा निर्णय अचानक मागे घेत नुकसानीसाठी दुप्पट दराने नव्हे, तर सामान्य दराने मदतीची मागणी करण्याच्या सूचना केल्या आहेत.
गतवर्षी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीसाठी राज्य सरकारने एनडीआरएफ निकषाच्या दुप्पट मदत दिली. यावर्षी जानेवारी व मार्च महिन्यांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून अहवाल देताना सामान्य निकषानुसारच मागणी करावी, अशा सूचना राज्य सरकारकडून प्रशासनाला प्राप्त झाल्या. या सूचनेनुसार अहवाल पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.