शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

मुंबई महापालिकेवर राज्य सरकारचा ‘वॉच’

By admin | Published: June 21, 2016 4:21 AM

राज्यातील सत्तेच्या जोरावर मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला महापालिकेत दणक्यावर दणके देण्यास सुरुवात केली आहे़ पालिकेच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारमधून चक्क लेखापरीक्षक

मुंबई : राज्यातील सत्तेच्या जोरावर मित्रपक्ष भाजपाने शिवसेनेला महापालिकेत दणक्यावर दणके देण्यास सुरुवात केली आहे़ पालिकेच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी राज्य सरकारमधून चक्क लेखापरीक्षक पाठविण्यात येणार आहे़ पालिकेची इतिहासातील अशा प्रकारची ही पहिलीच नेमणूक असणार आहे़ त्यामुळे महापालिकेत सत्तेवर असूनही शिवसेनेचे धाबे दणाणले आहे़ राज्य शासनाच्या लेखा-सेवा विभागाचे साहाय्यक संचालक सुरेश कचरू बनसोडे यांची महापालिकेच्या मुख्य लेखा परीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यावर स्थायी समितीचे अधिकार डावलण्याचा हा प्रकार असून या नियुक्तीला तीव्र विरोध करू, असा इशाराही सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांनी दिला. दरम्यान आगामी निवडणुकीच्या तोंडावर ही नेमणूक म्हणजे भाजपाने वचक ठेवण्यासारखे असल्याने शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे़ त्यामुळे ही नियुक्ती रद्द करून घेण्यासाठी शिवसेनेची व्यूहरचना सुरू आहे़ त्यानुसार पालिकेचे प्रभारी मुख्य लेखापरीक्षक अनिल बडगुजर यांनाच कायम ठेवण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे़ चिटणीस आणि लेखा विभाग स्थायी समितीच्या अखत्यारित असल्याने राज्य सरकारने अशापद्धतीने अधिकारी पाठविणे अयोग्य असल्याचा सूर शिवसेनेने लावला आहे़ (प्रतिनिधी)..............................बनसोडे यांना सूत्र नाहीच़़मुख्य लेखापरीक्षक म्हणून नियुक्त झालेले सुरेश बनसोडे यांना येत्या तीन चार दिवसांमध्ये पदभार स्वीकारायचा आहे़ मात्र शनिवारी ते पालिका मुख्यालयात आले होते़ परंतु आयुक्त त्यावेळी नसल्याने बनसोडे यांना सूत्र देण्यास अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी नकार दिला़ बनसोडे यांनी आज पुन्हा दूरध्वनी केला असता त्यांना नकारच मिळाला़़.............................. विधि समितीचे मत घेणारबाहेरील अधिकाऱ्याला महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यास न्यायालयाची स्थगिती आहे़ ही स्थगिती उठविल्याचा दावा बनसोडे यांनी केला असल्याचे समजते़ मात्र पालिका प्रशासन याबाबत अद्याप संभ्रमातच आहे़ त्यामुळे याप्रकरणी विधि विभागाचे मत आल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते़