मुंबई : शैक्षणिक साहित्याची विक्री छापील किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या राज्यातील सुमारे २५३ दुकानांवर वैध मापन शास्त्र यंत्रणेने खटले दाखल केले आहेत. राज्यात एकाच दिवशी विशेष तपासणी मोहिम राबविण्यात आली होती.शैक्षणिक साहित्याची विक्री छापील किमतीपेक्षा जास्त दराने करून ग्राहकांची लूट होत असल्याच्या तक्रारी वैध मापन शास्त्र विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने वैध मापन शास्त्र विभागाचे नियंत्रक तथा विशेष पोलीस महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर विशेष मोहिमेद्वारे तपासणी करण्यात आली. या तपासणीत दोषी आढळलेल्या एकूण २५३ प्रकरणांपैकी १० प्रकरणे ही छापील किमतीपेक्षा जास्त दराने साहित्याची विक्री केल्याबद्दल, २३० प्रकरणे आवेष्टित (पॅकबंद) स्वरूपाच्या शालेय वस्तूंवर विहित माहिती न दिल्याबद्दल आणि ८ प्रकरणी माहितीची खाडाखोड केल्याबद्दल खटले दाखल करण्यात आले आहेत. तसेच दोन दुकानांनी छापील माहितीपेक्षा कमी प्रमाणात वस्तू दिल्याप्रकरणी आणि तीन दुकानांनी वजने मापांची विहित वेळेत फेरपडताळणी व मुद्रांकन न केल्याबद्दल तक्रार नोंदविण्यात आली आहे. (प्रतिनिधी)>येथे नोंदवा तक्रार...शालेय साहित्याची विक्री ही छापील किमतीपेक्षा जादा दराने होत असल्याचे आढळून आल्यास, ग्राहकांनी क्षेत्रीय वैधमापन शास्त्र कार्यालयाशी संपर्क साधावा. फेसबुक पेजवर तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन वैधमापन शास्त्र यंत्रणेचे नियंत्रक गुप्ता यांनी केले आहे.>मुंबईतील १६ दुकानांवर कारवाई खटले दाखल केलेल्या दुकानांची यादी पुढीलप्रमाणे- मुंबई विभाग - मे. स्मिता स्टेशनरी अँड झेरॉक्स, परेल, मे.साईकृपा स्टेशनरी, वरळी, मे.लाइफ एंटरप्रायझेस, माहिम, मे.जयहिंद स्टेशनरी, रानडे रोड, दादर, मे.आयडियल स्टार, दादर, मे.आर.के.ट्रेडर्स, सुतार चाळ, मे.ऋषभ स्टेशनरी, फोर्ट, मे.राज एजन्सी, काळाचौकी, मे.अनिल कटलरी, सरदार नगर, सायन, मे.ए टू झेड स्टेशनरी, मुंबई सेंट्रल, मे.स्कॉलर बुक डेपो, सांताक्रुझ, मे.रॉयल स्टेशनरी, सांताक्रुझ, मे.नॉव्हेल्टी स्टेशनरी मार्ट, अंधेरी, मे.ए टू झेड स्टेशनरी, अंधेरी, मे.न्यू झेरॉक्स पॉइंट, एस.व्ही.रोड, अंधेरी, मे.हरिसन नॉव्हेल्टी, जोगेश्वरी या शालेय साहित्याची विक्री करणाऱ्या दुकानांची तपासणी करून खटले दाखल करण्यात आले.राज्यभरातही वेगाने कारवाई : ठाणे व रायगड जिल्ह्यातील मे.सत्यम स्टेशनरी आणि झेरॉक्स, राम मारुती रोड, मे. स्टेशनरी एक्स्प्रेस, वीर सावरकर मार्ग, चरई, मे.गीता स्टेशनरीज अँड जनरल स्टोअर, रबाळे, मे.स्टुडंट बुक डेपो, मे.सागर स्टेशनरी, कासार आळी, भिवंडी, मे.विनीत विविध वस्तू भांडार, माणगांव, मे.सुंदरम स्टेशनरी शॉप, पनवेल, मे.प्रभात स्टेशनरी अँड झेरॉक्स पनवेल, मे.पौर्णिमा बुक सेलर, अलिबाग, मे.मनोज स्टेशनरी, रोहा यांवर कारवाई केली आहे.
वैधमापनशास्त्र यंत्रणेची राज्यभर कारवाई
By admin | Published: July 18, 2016 5:08 AM